शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण प्रात्यक्षिके

28

अभ्यास दोऱ्यानिमित्त कोटगल येथे माती परीक्षण प्रात्यक्षिके व शेतकऱ्यांना मार्गदर्शन 

मुल : मुल: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय, मुल येथील कृषिदुतांनी कोटगल (जि. गडचिरोली) येथेमाती परीक्षण प्रात्याक्षिकाचे आयोजन करण्यात आले. 

शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणासंबंधी जनजागृती व्हावी, यासाठी उपक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी, रासायनिक खते देण्यापूर्वी किंवा खते दिल्यानंतर ३ महिन्यांनी मातीचा नमुना घ्यावा, माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन करावा, असा सल्ला कृषिदूतांनी शेतकऱ्यांना दिला. या बरोबरच शेतातील मातीचे नमुने गोळा करून त्याचे परीक्षण करण्यात आले. मातीमध्ये असणारे घटक, जमिनीचा सामू, मातीचा प्रकार या विषयी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शनदेण्यात आले. 

कृषिदुत ओम शिंदे, रेवत ढोक, कुणाल शेंडे, उज्वल दखने, मयूर जंगिलवार या कृषिदूतांनी मार्गदर्शन केले.