नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ…

29

मोदी 3.0! नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ…

आज भारताच्या राजकारणातील ऐतिहासिक दिवस आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात हा दैदिप्यमान सोहळा पार पडला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदींना गोपनीयतेची शपथ दिली. विशेष म्हणजे,यावेळी नरेंद्र मोदींसोबतच 69 खासदारांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सोहळ्यासाठी भारताच्या शेजारील देशांच्या प्रमुखांसह हजारो मोदी समर्थकांनी उपस्थिती होते.

 

 

या सोहळ्यासाठी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफिफ, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे उपस्थित होते.

मंत्रिमंडळात इतके मंत्री असणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन टीममध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळात 27 ओबीसी, 10 एससी, 5 एसटी, 5 अल्पसंख्याक मंत्री अशतील.

नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याबद्दल आदरणीय नरेंद्र मोदीजींचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. माननीय पंतप्रधानांच्या सक्षम नेतृत्वाखाली देश विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल आणि बिहारच्या विकासाला पूर्ण सहकार्य मिळेल.