आधार कार्ड अपडेट करून दहा वर्षे पूर्ण झाली असतील तर वास्तव्याचा पुरावा पुन्हा अपलोड करून ते अपडेट करण्याचे आवाहन

45

आधार काढून पाच वर्षे; अपडेट केले का?
पालकांनो लक्ष द्या: लहान मुलांचेही आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक
आधार कार्ड ओळखीसाठी महत्त्वाचे असून प्रत्येक वयोगटासाठी ते आवश्यक आहे. नवजात बाळांचेही आधार कार्ड बनवले जाते. मुलांच्या ५ वर्षांनंतर आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक अपडेट करणे आवश्यक आहे. अन्यथा मुलांचे आधार कार्ड इनअॅक्टिव्ह होते.

त्यानंतर पुन्हा वर्षांनंतर आधारकार्ड अपडेट करणे आवश्यक आहे.
आधार कार्ड हा भारतीय रहिवाशांसाठी ओळख आणि पत्त्याचा स्वीकारलेला वैध पुरावा आहे. एलपीजी सबसिडी, पेन्शन योजना आणि शिष्यवृत्ती, शाळा प्रवेश यासारख्या विविध सरकारी सबसिडी आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी बँक खाती उघडण्यासाठी आधार कार्ड हा पॅनसोबतच महत्त्वाचा दस्तऐवज आहे. नवजात मुलांसाठी ‘बाल आधार कार्ड दिले जाते.

आधार कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे
पत्त्याचा पुरावा, ओळखीचा पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा यासाठी पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका, जन्म प्रमाणपत्र, चालक परवाना यासारख विविध कागदपत्रे आवश्यक असतात

मुलांचे आधार पाच वर्षांनंतर अपडेट करणे आवश्यक
लहान मुलांच्या नावनोंदणीदरम्यान त्यांचे बायोमेट्रिक तपशील घेतले जात
नाहीत. त्यामुळे मूल ५ वर्षांचे असेल तेव्हा त्याचे बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे बंधनकारक आहे.
आधार कार्ड अपडेट करून दहा वर्षे पूर्ण झाली असतील तर वास्तव्याचा पुरावा पुन्हा अपलोड करून ते अपडेट करण्याचे आवाहन शासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी शिबिरे भरवली जातात. प्रशासकीय कार्यालय परिसर, शहरातील विविध बँका तसेच महापालिकेच्या काही विभाग कार्यालयात देखील आधार केंद्र सुरु आहे.
आधार कार्ड कोठे करणार अपडेट ?