नवी दिल्ली: करदात्यांनी ३१ मेपर्यंत त्यांचे पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंक करावे. केल्यास तुम्हाला अधिक कर भरावा लागू शकतो, अशी सूचना प्राप्तिकर विभागाने केली आहे. प्राप्तिकर विभागाच्या नियमांनुसार, जर तुमचा स्थायी खाते क्रमांक (पॅन) बायोमेट्रिक आधारशी जोडलेला नसेल, तर मूळ स्त्रोतातून कर वजावट (टीडीएस) लागू दराच्या दुप्पट दराने कापली जाईल.
यासंदर्भात प्राप्तिकर विभागाने गेल्या महिन्यात परिपत्रकही जारी केले होते. ज्या लोकांच्या खात्यातून कमी टीडीएस कापला गेला आहे, त्यांनी ३१ मेपर्यंत त्यांचा पॅन आणि आधार लिंक केल्यास त्यांना जास्त टीडीएस भरण्याची गरज भासणार नाही, असे सांगण्यात आले होते. तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. प्राप्तिकर विभागाने जर तुम्ही पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसेल, तर कृपया ते ३१ मेपूर्वी लिंक करा. याद्वारे तुम्ही अतिरिक्त कर कपात टाळू शकता, असे आवाहन सोशल मीडियावर केले आहे.
दुसऱ्या पोस्टमध्ये आयटी विभागाने बँका आणि फॉरेक्स डीलर्ससारख्या संस्थांना ३१ मेपूर्वी स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स (एसएफटी) दाखल करण्यास सांगितले आहे. अन्यथा त्यांना दंड होऊ शकतो. एसएफटीच्या माध्यमातून प्राप्तिकर विभाग एखाद्या व्यक्तीच्या मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर लक्ष ठेवतो. कर अधिकाऱ्यांकडे एसएफटी रिटर्न भरणे आवश्यक असलेल्या संस्थांमध्ये परकीय चलन विक्रेते, बँका, सब-रजिस्ट्रार, एनबीएफसी, पोस्ट ऑफिस, बाँड डिवेंचर जारीकर्ते, म्युच्युअल फंड ट्रस्टी, लाभांश देणाऱ्या किंवा शेअर्स खरेदी करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. एसएफटी रिटर्न भरण्यास उशीर झाल्यास दररोज १ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. चुकीचा तपशील भरल्यास किंवा न भरल्यास वेगळा दंडही आकारला जाऊ शकतो.
Home आपला जिल्हा Breaking News पॅनकार्ड – आधार ३१ मेपर्यंत लिंक करा@प्राप्तिकर विभागाची करदात्यांना सूचना