मूल शहरात मान्सूनपूर्व कामांसाठी महावितरणने कसली कंबर@विद्युत खांबावर लोंबकळणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडण्यास सुरुवात

35

 महावितरणला कामात सहकार्य करण्याचे आवाहन  :-मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या उन्हाच्या तडाख्यासोबतच अधून-मधून येणारा अवकाळी पाऊस व त्यानंतरच लगेच सुरू होणारा पावसाळा वीजग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी महावितरणने विविध ठिकाणी मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहे.  सर्वत्र वीजवाहिन्यांच्या आड येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यासह इतरही अनेक कामे वेगाने सुरू आहे.मूल शहरात सकाळी 7 ते 10 वाजता पासून तहसील कार्यालय मूल परीसरापासून ते चद्रपूर रोड मार्गाने सध्या झाडाच्या फांदया तोडणे चालू असल्यामूळे शहरातील लाईन सकाळी जात आहे.कडक उन्हाच्या झळा झेलत महावितरणचे कर्मचारी देखभाल व दुरुस्तीच्या कामात गुंतले आहे. साधारणतः मे महिन्यात संपूर्ण विदर्भात अंगाची लाही लाही करणारे तापमान असते. त्यातच अधूनमधून विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याच्या घटनाही या काळात होत असतात. महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेतील बहुतांश सामग्री ही उघड्यावर असल्याने वातावरणात होणाऱ्या बदलाचा प्रतिकूल परिणाम वीज वितरण यंत्रणेवर होत असतो व पर्यायाने त्याचा परिणाम ग्राहक आणि ग्राहक सेवांवर होतो. यामुळे उन्हाळा व त्यानंतर लगेच सुरू होणारा पावसाळा हा वीजग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी महावितरण कामाला लागली आहे.
    वाढलेल्या झाडांच्या फांद्या तारांवर लोंबकळत असतात, या फांद्या काही ठिकाणी तारांवर घासत असतात व यामुळे विद्युत यंत्रणेची क्षती होत असते, ही हानी टाळण्याकरिता सर्व संबंधितांनी आपापल्या भागातील यंत्रणेची या द ष्टीने चाचपणी करून गरजेनुसार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने या फांद्या तोडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. वीज तारांमध्ये अडकलेले पतंग, मांजा, पताका, तोरण, फ्लेक्स
बॅनर्स, प्लॅस्टिक झेंडे याचाही फटका यंत्रणेला बसत असतो. यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. वीजवाहिन्यांत अडकलेले पतंग, मांजा, कपड्यांचे तुकडे किंवा तत्सम काहीही
तारांवर असेल तर ते वेळीच काढून टाकण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहे.
सैल झालेले गार्डिंग व स्पॅन घट्ट करणे, दोन खांबांमधील झोल
पडलेल्या तारा ओढून घेणे, सर्व खांब आणि त्यांचे ताण सुस्थितीत करण्याचे कामही मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे.