वाघाने जखमी केलेली म्हैस आज घरीच मृत्यू

50

मूल:- तालुक्यातील आंतरगाव पारडवाही शेतशीवरात दिनांक 30/02/2023 ला शेतशिवरात म्हैस चरण्यासाठी गेली असता वाघाने जखमी करून सोडून दिली असता म्हैस सायकांळच्या वेळी घरी आली असता म्हैस च्या शरीरावर खोलवर जखमा झाल्या होत्या मालकाने ताबडतोब वनविभागा माहीती दिली असता पंचनामा करण्यात आलेला होता.
त्यानंतर पशूवैद्यकिय डाॅक्टर कडे उपचार चालू होता त्यानंतर आज दिनांक 26 /05/2024 ला सकाळी 5 वाजता मरण पावली त्यानंतर सहायक वनक्षेत्र अधिकारी मूल यांना कळविण्यात आल्यानंतर पंचनामा करून मालकाला वनप्राण्यांच्या हल्लामुळे झालेल्या पशु नकसानीची नुकसान भरपाई आॅनलाईन अर्ज भरून वनविभागाला देण्यात यावे असं सांगण्यात आला.म्हैस मृत पावली त्यामुळे या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरलीआहे. वैनगंगा नदीच्या भरोशावर अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी भाजीपाला लागवड करतात त्यामुळे या परिसरात पाण्याची
सोय असून थंडावा असल्याने या परिसरात वाघाचा वावर वाढला आहे. खरिपाच्या  तोंडावर मान्सूनपूर्व हंगामाची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केलीआहे. त्यामुळे शेतात मशागती  करिता शेतकरी शेतमजूर  शेतात राबतांनाचे चित्र आहे.मात्र अशा स्थितीत जनावरांवर होणारे हल्ले मानवावर होण्यास वेळ लागणार नाही.परिणामतः जीवित हानी होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी  भीतीच्या वातावरणात जीव  मुठीत घेऊन शेतात राबत आहेत.