मूल शहरात मतदान शांत पणे सुरू

26

चंद्रपूर मतदार संघात 1 वाजेपर्यंत 30.96 टक्के

मूल:- चंद्रपूर वणी आर्णी मतदार संघातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात येणा-या मूल शहरात विविध केंन्द्रावर मतदानाला सकाळी 7 वाजात पासून सुरूवात झालेली असून दुपारी 12.50 पर्यंत विविध केंन्द्रावर 20ते25 टक्के पर्यंत मतदान झाले असल्याचे निर्देशनात आले आहे. मूल मधील 101 क्रमांकाच्या मतदान केंन्द्रावर मतदान मशीन काही तांत्रीक कारणास्तव बंद पडल्याने साधारण 1.30 तास मतदान प्रक्रिया खोळबंली होती त्यामूळे केंन्द्रावर बरीच गर्दी दिसून येत होती.

दुपारी उन्हाचा तडाखा बसण्याची शक्यता लक्षात घेता सकाळीच मतदान उरकून घेण्याचा कल मतदारांमध्ये आहे.

त्यामुळे बहुसंख्य मतदान केंद्रांमध्ये मतदारांनी गर्दी केली आहे. मतदान शांतपणे सुरू आहे. आतापर्यंत कोणत्याही अनुचित घटनेची तक्रार झालेली नाही.इतर केंन्द्रावर संथ गतीने मतदान सुरू होते. जिल्हा परीशद प्राथमिक शाळा मूल गांधी चैकातील मूल येथे नव्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला तर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील बुथ्र क्रामंक 110 वर ताराबाई तुकाराम कस्तुरे वय 110 यांनी मतदान केले काजाल बारासागडे,प्रजोती भडके यांनी केंन्द्रक्रंमाक 116 वर तर आचल गरीपत्ते हिने केंन्द्र क्रमांक 109 बाजार समिती मूल येथे पहिल्यांदा आपल्या मतांचा हक्क बजावला. केंन्द्र क्रमांक 115 वर 1200 हून अधिक मतदारांची नोंदणी असून हे केंन्द्र अडचणीच्या ठिकाणी असल्याने मतदारांना दाटीवाटीने उभे राहावे लागत असून या केंन्द्रावर गर्मी व पाण्याची कमतरता या मूळे मतदार त्रास होते. 

मुनगंटीवार व धानोरकर यांचे मतदान

चंद्रपूर शहरातील सिटी हायस्कूल येथील मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी सहपरिवार जाऊन मतदानाचा हक्क बजावला. तर वरोरा येथील मतदान केंद्रावर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. ब्रह्मपुरी येथे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तर राजुरा येथे आमदार सुभाष धोटे तर चिमूर येथे आमदार बंटी भांगडीया आणि चंद्रपूर येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदान केले.