मूल शहर तालुक्यात@मतदानाला उत्साहात सुरुवात

40

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी 72 – बल्लारपूरया विधानसभा मतदारसंघ,येथे  लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून अनेक मतदान केंद्रांवर नागरिकांचा उत्साह दिसून येत आहे.

शाळेतील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले.टेकाडी येथील प्रमोद बोम्मनवार शाळेतील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले.बूथ क्र.१०३ वरील पाहिले मतदान. विवेक mandade. यांनी सकाळी सव्वा सात वाजताच मतदान केले.सर्वात अगोदर मतदानकेंद्रावर पोहोचतात व यावर्षीदेखील ही परंपरा त्यांनी कायम ठेवली.

बाहेर आल्यावर त्यांनी नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्याचे आ‌वाहन केले. मतदान आपला अधिकार व कर्तव्य आहे. १०० टक्के मतदान झाले पाहिजे व त्यासाठीच मी आज सर्वात अगोदर मतदानाचेच कर्तव्य पार पाडले, असे प्रतिपादन यावेळी केले.

आम्ही मतदान केलं तुम्ही करा राष्ट्र कार्यास सहकार्यअशा प्रकारचे संदेश अन्नदाता या ग्रुपच्या माध्यमातून संदेश दिसून येत आहे.

टोकन सुविधा : उन्हाचा तडाखा लक्षात घेता मतदान केंद्रावर मतदारांकरीता निवारा / प्रतिक्षालय तयार करण्यात आले आहे. तसेच मतदान केंद्रावर गर्दीची परिस्थिती उद्भवून मतदारांना अडचण होणार नाही, याकरीता टोकन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दिव्यांग व्यक्तिंसाठी उपाययोजना : मतदान केंद्रावर दिव्यांग मतदाराकरीता त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर प्रशासनाकडून मतदारांच्या मदतीकरीता मदतनीस / स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे.