“ समाज परिवर्तनाच्या जाणिवा पेरणारा कवी म्हणजे कुसुमाग्रज होय” -प्राचार्या डॉ .अनिता वाळके

25

कवी कुसुमाग्रजांनी समाजातील रुढीपरंपरां,अन्याय व विषमता यावर कठोर प्रहार केले.साहित्य व साहित्यिकानी सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे या मताचे ते पुरस्कर्ते होते .सामाजिक परिवर्तन घडवुन आणण्याकरिता ते फार आग्रही होते म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत त्यानी भाग घेतला होता. असे मत आज दि.27 फेब्रुवारी ला शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित,गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालय मूल येथे,”मराठी भाषा गौरव दिन” संपन्न झाला त्या निमित्याने कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ.अनिता वाळके यांनी आपले विचार व्यक्त करतानां सांगितले
या कार्यक्रमास विचारपीठावर म्हणुन मुल शहरातील प्रसिद्ध दंत चिकित्सक व मराठी भाषचे अभ्यासक डॉ.रोशन दुर्गे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच इंग्रजी विभाग प्रमुख डॉ गणेश गायकवाड, प्रा. दिनेश बनकर सर उपस्थित होते.
प्रमुख अतिथी डाॅ. रोशन दुर्गे यानी आपल्या अभ्यासपुर्ण भाषणातुन प्रमाण भाषा ,बोली भाषा यातील फरक सांगुन तिच्या उत्क्रांतीचा इतिहास विशद केला व मराठी भाषा संवर्धनाकरिता माहिती दिली, तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी.त्यासाठी वाचनाचे सवय विद्यार्थ्यांनी लावावी . तंबाखू,गुटका, खर्रा या व्यसनावर विद्यार्थ्यांनी स्वतः ला दूर ठेवावे.उत्कॄष्ठ साहित्याचे सतत वाचन करून जीवनात यश मिळवावे असे मौलीक मार्गदर्शन सरांनी आपल्या मार्गदर्शनात केले. डाॅ.गणेश गायकवाड सरांनी मराठी भाषेची महती, तिची थोरवी ही आई सारखी असते , तिच्या पासून वेगळे राहुच शकत नाही असे परखळ विचार व्यक्त केले. प्रा.दिनेश बनकर सरांनी कुसुमाग्रजांच्या साहित्यवर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतुन प्रा.भुषण वैद्य यांनी अभिजकते पासुन तर आधुनिकते पर्यंतचा मराठी भाषेचा प्रवास व गौरव विशद केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.राकेश मोटकुलवार यानी केले आणि आभारप्रदर्शन प्रा.समीर आलुरवार यांनी केले. काही विद्यार्थीनी आपले मनोगत व्यक्त करतांना कुसुमाग्रजांच्या साहित्यवर प्रकाश टाकला.कार्यक्रमास सर्व प्राध्यापक वर्ग व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थांनी मेहनत घेतली.