शेतपिक नुकसानीचा लाभ मिळण्याकरिता केव्हायसी करावे- मृदुला मोरे तहसिलदार

52

माहे एप्रिल 2023 रोजी आलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे 116 नुकसानग्रस्त खातेदाराचे 59.55 हे. आर शेतपिकाचे नुकसान झालेले होते. तसेच माहे जुर्ले, 2023 रोजी आलेल्या अतिवृष्टी व पावसामुळे 265 खातेदाराचे 122.24 हे. आर शेतपिकाचे नुकसान झालेले असुन शेतपिक नुकसान झालेल्या खातेदाराच्या यादया E-Panchnama Payment Disbursement या पोर्टलवरुन Online अपलोड करण्यात आलेल्या आहेत. अपलोड करण्यात आलेल्या खातेदाराच्या यादयामध्ये 218 खातेदाराच्या नावासमोर विशिष्ट क्रमांक VK Number 2324RNRHR4072AKA07149118 याप्रमाणे Panchanama Code देण्यात आलेला असुन असा Panchanama Code प्रत्येक 218 खातेदाराच्या नावासमोर देण्यात आलेला आहे.
218 यादीतील प्रत्येक खातेदारानी विशिष्ट क्रमांक 2324RNRHR4072AKA07149118 हा Panchanama Code घेउन ग्राहक सेवा केंद (CSC) केंद्रावर किंवा आपल्या जवळच्या सेतु सुविधा केंद्रावर जाडुन E-KYC प्रमाणीकरणाची प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. जोपर्यत खातेदार E-KYC प्रमाणीकरण करणार नाही तोपर्यंत खातेदाराला शेतपिक नुकसानीचा लाभ/मदत मिळणार नाही.
करीता सर्व तलाठी यांनी आपल्या साजाअतंर्गत येणा-या गावातील शेतक-यांना E-KYC प्रमाणीकरणाची प्रक्रिया करणे बंधनकारक असल्याबाबत सुचित करण्यात यावे तसेच शेतपिक नुकसान विशिष्ट क्रमांक/VK Number 2324RNRHR4072AKA07149118/Panchanama Code असलेली 218 खातेदाराच्या यादीची एक प्रत कार्यालयाचे नोटीस बोर्डावर लावुन प्रसिध्द करावी. तसेच आपल्या साजाअतंर्गत येणा-या गावामधील ग्रामपंचायतमध्ये यादया प्रसिद्ध करण्यात याव्या. सदर गांवामध्ये चावळीवर दंबडी देण्यात यावी व उलट टपाली प्रसिध्दी प्रतिवेदन या कार्यालयास सादर करावे. तसेच आपल्या साजाअतंर्गत येणाच्या गावातील आपले सरकार केंद्र व CSC केंद्र या दोन्ही यंत्रांनी सुद्धा आपले स्तरावरून E-kyc बाबत प्रसिद्धी देऊन आलेल्या लाभार्थ्यांची E-kyc तत्काळ करून घेण्याबाबत सुचित करावे. तालुक्यातील कोणतेही पात्र लाभार्थी e- पात्र लाभार्थी e-
kyc प्रमाणीकरण अभावी शेतपिक नुकसान लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
(मृदुला मोरे) तहसिलदार, मु