मा. विवेक जॉनसन , मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर यांचे कडून उमेद अभियानाच्या विकास कामांना भेट.
उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष मुल येथील भगवानपुर या पुनर्वसन ग्रामपंचायत येथे उपजीविका संदर्भात सुरु असलेल्या कामाना मा. विवेक जॉनसन , मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर यांचे कडून भेट देण्यात आली. अभियानाच्या मध्यमातुन गावा गावात बचत गट बनविण्यात आले त्यांना शासनाच्या वतीने खेळते भांडवल, समुदाय गुंतवणूक निधी, बँक लोन, आदी स्वरूपात निधी उपलब्ध करून महिलांची शाश्वत उपजीविका निर्माण करने यावर भर दिले जात आहे तालुक्यातील अनेक महिलांनी आपले लघु उद्योग सुरु केलेले आहे याचं विकास कामाची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून करण्यात आली भेटी दरम्यान त्यांनी व्यवसाय कर्ती महिलांशी संवाद साधून प्रोत्साहित करण्यात आले. तसेच चिरोलि येथील अभियानाच्या वतीने देण्यात आलेल्या आलेल्या डाळ मिल युनिट चे उदघाटन करण्यात आले तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी महिलांना व्यवसायाकरिता शुभेच्या दिले तसेच समूहातील महिलांना व्यवसयाकरिता कियोस्क किट वाटप करण्यात आली प्रसंगी मा. विवेक जॉनसन , मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर, मा. विशाल मेश्राम, उप विभागीय अधिकारी, मा.बी.एच. राठोड , गट विकास अधिकारी, मा. नितीन वाघमारे, तालुका अभियान व्यवस्थापक, उमेद मूल , पंचायत समिती तथा उमेद कक्षातील इतर अधिकारी / कर्मचारी वृंद उपस्थित होते.