आधार कार्ड हे जन्मतारखेचा पुरावा नव्हे : जन्मतारखेचा पुरावा द्यायचा असेल तर जन्म दाखला

54

आजवर आपण जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्डचा वापर करत असलो तरी आता युआयडीएआयने यासाठी नवीन अपडेट जारी केले आहे.

कुणाही भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट मानले जाते.

आता मात्र युनिक आयडेंटिफिकेशन कार्ड ऑफ इंडिया म्हणजेच युआयडीएआयने आधार कार्डाबाबत महत्त्वाचे बदल केले आहेत. या नव्या नियमानुसार आता आधार कार्ड हे जन्मतारखेचा पुरावा असणार नाही. त्यासाठी जन्म प्रमाणपत्र आवश्यक असेल. या महिन्यापासून हा नियम लागू होणार आहे.

युआयडीएआयशी संबंधित अधिकार्‍यांनी त्यांच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, फसवणूक थांबवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ही माहिती आधार कार्डवरही नमूद करण्यात येत आहे. आता नवीन आधार कार्ड डाउनलोड केल्यानंतर यावर संबंधीत बाब नमूद करण्यात आलेली असेल. युआयडीएआयने आधारमध्ये जन्मतारीख बदलून जन्मतारीख, महिना, वर्ष बदलून फसवणूक रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. आधार कार्ड यापुढे जन्मतारखेचा पुरावा असणार नाही. जन्मतारखेचा पुरावा द्यायचा असेल तर जन्म दाखला देणे बंधनकारक असेल. आधार कार्ड बनवणार्‍या संस्थेने १ डिसेंबरपासून हा बदल केला आहे.

दरम्यान, आधार कार्डमधील बदलांची माहिती प्रत्येकाने ठेवली पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आधार कार्डमध्ये काही दुरुस्त्या असल्यास, कुणीही या दुरुस्त्या आणि सुधारणा ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही करू शकतात.