विकसित भारत संकल्प यात्रा – यात्रेच्या माध्यमातून गडीसूर्ला,नवेगाव भूजला येथे सरकारच्या विविध योजनांची माहिती.

54

‘विकसित भारत संकल्प यात्रा ‘ची मुल तालुक्यात  प्रभावी अंमलबजावणी

समाजातील सर्वसामान्य घटकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. त्या लाभार्थ्यांपर्यंत प्रभा‍वीपणे पोहोचविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या यात्रेच्या माध्यमातून नागरीकांना विविध योजनांचा लाभ मिळणार असल्याने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  दिले.

 विविध योजनांमध्ये पात्र असलेल्या परंतु अद्यापपर्यंत लाभ न मिळालेल्या व्यक्तींपर्यंत केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेची मुल तालुक्यात अंमलबजावणी भाग म्हणून दिनांक 09 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजाता गडीसूर्ला येथे तर नवेगाव भूजला येथे 3 वाजता आयोजीत करण्यात आलेली होती.उपक्रमाच्या अंमलबजावणीची माहिती  केंद्र शासनासह राज्याच्या योजनांची देखील या कालावधीत जनजागृती केली.

      यावेळी नवेगाव भूजला येथील सरपंच यशवंत खोब्रागडे,पोलीस पाटील भोजराज चावरे,सचिव शेख मॅडम,सचिनभाउू येरमलवार,ग्रामरोजगार सेवक,तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरीक,विद्यार्थी,ज्येष्ठ नागरीक,विविध विभागातील कर्मचारी वृंद,पंचातय समिती मधील कर्मचारी वृंद,भूमिअभिलेख कर्मचारी वंृद
,आरोग्या विभागातील कर्मचारी,महिला बचत गटकर्मचारी,आशा,गटप्रवर्तक,आधार केंन्दा्रतील कर्मचारी उपस्थित होते.यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

योजनांमध्ये पात्र असूनही अद्याप लाभ न मिळालेल्या नागरिकांना लाभ मिळवून देणे, योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे आदी कार्यवाही मोहिमेद्वारे केली जाणार असून, वंचित समुदायासाठी असलेल्या योजनांच्या जनजागृतीचे ध्येय ‘ विकसित भारत संकल्प यात्रे’ तून साध्य होणार असल्याचे  यांनी सांगितले.