विद्यार्थ्याना मिळणार संगणक व प्रोजेक्टरच्या साह्याने शिक्षण

28

मूल/तालुका प्रतिनिधी    विद्यार्थ्याना संगणकिय व चित्र फितीच्या माध्यमातुन
ज्ञान मिळावे यासाठी सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूलला मुंबईच्या बेटनी सिस्टम कंपनीने सामजिक बांधिलकी जोपासत संगणक संच व प्रोजेक्टरची मदत केली. याचा लाभ विद्यार्थ्याना देता यावा यासाठी शाळेत कार्यरत सर्व समित्यांचे पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. उज्वल बोकारे यांच्या हस्ते पार पडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक. मारोती कोकाटे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष बंडू घेर, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सुवर्ण पिपरे ,माता पालक संघाच्या उपाध्यक्ष इंदुताई मडावी,शाळा सल्लागार समितीचे सदस्य प्रा. महेश पानसे, गिताचार्य सुखदेव चौथाले, शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप, पदवीधर शिक्षक राजू गेडाम आदी उपस्थित होते.

यावेळी संगणक व प्रोजेक्टरचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. उपस्थित मान्यवर व पालकानी विद्यार्थ्यासाठी बेटनी कंपनीचे संचालक स्नेहल कुमार बोकारे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन अजय राऊत तर उपस्थितांचे आभार रिना मसराम हिने मानले.