एफ.ई.एस.गल्स॔ महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम संपन्न

26

एफ.ई.एस.गल्स॔ महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम संपन्न

फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर व्दारा संचालित एफ.ई.एस.गल्स॔ काॅलेज चंद्रपूर येथील रासेयो विभागाद्वारा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ.मिनाक्षी ठोंबरे प्रमुख अतिथी डॉ कल्पना कावऴे, प्रा.योगेश निमगडे डॉ.शितल निमगडे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राजेंद्र बारसागडे,प्रा.डाॅ.प्रज्ञा जुनघरे यांची प्रामुख्याने विचार मंचावर उपस्थिती होती
प्राचार्य डॉ मिनाक्षी ठोंबरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य कतृ॔त्वाचा आढावा घेऊन त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्त केली,प्रा.योगेश निमगडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध प्रसंगातुन त्यांच्या चरित्राचा परिचय करून दिला तर प्रा.डाॅ.शितल निमगडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक, सामाजिक,राजकीय, घडामोडी चा आढावा घेतला.प्रा.आर्मपाली देवगडे यांनी सुध्दा कार्यक्रमास अनुसरून आपले विचार व्यक्त केले.
प्रा.डाॅ.अंजली ठेपाले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर स्वरचित कविता सादर केली.रासेयो स्वंयसेवीका ऋती गव्हारे यानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीत गायले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.प्रज्ञा जुनघरे तर आभार प्रा डॉ राजेंद्र बारसागडे यांनी मानले
सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यास प्रा.लोकेश दवे॔ , सुशिल पुप्पलवार, वामन तपासे,बंडु वरवाडे, रमेश गुरनुले यांचे मोलाचे सहकार्य लाभले