मूलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार डॉ रविंद्र होळी यांनी उकलले यशस्वीतेचे अनेक पैलू!

85

प्रेस क्लबच्या वतीने शहरातील धोरणात्मक बदल घडविणार्यां व्यक्तीमत्वांना बोलके करण्यासाठी ‘मीट द प्रेस’ची सुरूवात मूलचे तहसिलदार डॉ. रविंद्र होळी यांचे हस्ते करण्यात आली.  प्रेस क्लबच्या या उपक्रमाचे त्यांनी स्वागत करीत, असे उपक्रम राबविणारे ही पहिलीच पत्रकार संघटना असल्यांचे मत त्यांनी यावेळी मत व्यक्त केले.

वैद्यकीय शिक्षणानंतर, डॉ. होळी हे युपीएससी करीता दिल्लीत गेलेत.  तीथे चार वर्ष युपीएससीची तयारी झाली मात्र त्यात अपेक्षीत यश न मिळाल्यांने परत गावाकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याचे हेतूने परत आलेत. 2011—2012 मध्ये एमपीएससी ची परिक्षा उत्तीर्ण होवून थेट तहसिलदार म्हणून निवड झाल्यांने, वैद्यकीय व्यवसाय बाजूला राहीले आणि महसूल विभागात कार्यरत झाले असल्यांची माहीती ​त्यांनी दिली.

तहसिलदार म्हणून कार्य करीत असतांना, आदिवासींना, कुळांना त्यांचे जमिनीचे अधिकार, आदिवासींच्या जमिनीचे प्रत्यार्पण करण्याची संधी मिळाली हा आपल्यासाठी महत्वाचे असल्यांची प्रांजळ कबुली त्यांनी दिली. आपल्या लहान भावाचा झालेला मृत्यू हा आपल्यासाठीचा पहिला दु:खद प्रसंग असल्यांचेही त्यांनी एका प्रश्नाचे उत्तरात माहीती दिली.

 महसूल प्रशासनाचे प्रमुखपद तहसीलदारांकडे असते. त्यामुळे त्यांच्या तहसीलमधील गावे संपूर्णत: तहसीलदारांच्या ताब्यात आहेत. यामुळे, तहसीलदार आपल्या तहसीलला नेमून दिलेली कामे पूर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी असते.

तहसील कार्यालयात तहसीलदाराने केलेले काम जमीन, कर, समस्या सोडवणे, भूसंपादनाची प्रकरणे, नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान, कागदपत्राशी संबंधित मजूर आणि इतर अनेक कामांशी संबंधित आहे

तहसीलदार हा राज्यस्तरीय अधिकारी असतो जो जिल्ह्याचा मुख्य तहसील अधिकारी म्हणून काम करतो आणि तहसीलच्या गावांचा आणि रहिवाशांचा प्रभारी असतो. त्यांची प्राथमिक जबाबदारी योग्य मदत देणे आहे आणि तहसीलमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व गावांची काळजी घेणे ही तहसीलदारांची प्राथमिक जबाबदारी आहे.

तहसीलदार त्यांच्या तहसीलसाठी विविध कामे हाताळतात, ज्यात जमीन-संबंधित काम, कर-संबंधित काम, समस्या सोडवणे, नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान, दस्तऐवज-संबंधित काम, जमीन खरेदीचे प्रश्न इ.

तहसिलदार म्हणून कार्य करीत असतांना,जमीन-संबंधित काम, सुनावणी आणि जमीन-संबंधित विवादांचे निराकरण करण्यासहपटवारीच्या कामावर देखरेख करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
जमिनीच्या नोंदीशी संबंधित कामांचे अनेक प्रकार आहेत.जमिनीशी संबंधित माहिती मिळविण्यात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये याची खात्री करणे.
जातीचे दाखले, रहिवासी पुरावे, उत्पन्नाचे दाखले इत्यादींसह महत्त्वाची कागदपत्रे केवळ तहसीलदारांच्या स्वाक्षरीने वैध आहेत.पीक-संबंधित कोणतेही नुकसान झाल्यास तहसीलदार नुकसान भरपाईची मर्यादा घालतात.
या व्यतिरिक्त, त्यांना विविध प्रकारची कार्ये करणे आवश्यक आहे आणि त्यांच्याकडे आवश्यकतेनुसार ते नियोजित करू शकतील अशा विस्तृत क्षमता देखील आहेत.

संजय गांधी निराधार योजना, रेशन वाटपात जिल्हयात सर्वाधिक लाभार्थी मूल तालुक्यातील असल्यांचीही माहीती देत, सामाजीक दायीत्व  जोपासल्यांचा आनंद मिळत असल्याचे सांगितले.

शेती करण्यात आपल्याला बालपणापासून आवड असल्यांचे सांगत, संघटीत झाल्याशिवाय धान उत्पादकांना न्याय मिळणार नाही याकडे डॉ. होळी यांनी लक्ष वेधले. मूल तालुक्यात एका शेतकर्यांकडे सरासरी 1 एकर शेती असल्यांने, एवढया कमी आकाराची शेती करणे आर्थिकदृष्ट्या फायद्याची नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.  आपल्या कार्यकाळात 4500 चे वर संयुक्त 7/12 मधून स्वतंत्र 7/12 केले असल्यांचीही माहीती त्यांनी दिली.  सरासरी कमी दिवसांत फेरफार करणारे तहसिल कार्यालयात मूल तालुका राज्यात आघाडीवर असल्याची माहीती त्यांनी एका उत्तरात दिली.  भविष्यात निवृत्तीनंतर आपण मेडिटेशन करणार असल्याचीही त्यांनी माहीती दिली.

मीट द प्रेसचे संचालन धर्मेद्र सुत्रपवार यांनी केले, प्रास्ताविक दीपक देशपांडे यांनी केले तर पत्रकारांचा परिचय अमीत राऊत यांनी कुमुदिनी भोयर,सतिश राजूरवार, धर्मेंद्र सुत्रपवार, राजेंद्र वाढई ,नासिरखान, प्रमोद मशाखेत्री ,मंगला बोरकुटे उपस्थित होतो. आभार प्रदर्शन विजय सिध्दावार यांनी केले.