सावधान, बंद घर दिसताच घरफोडी; चोरांची पाळत
मुल :— शहरातील जुन्या वस्तीमधील वार्ड क्रमांक 12 रामलीला भवनच्या मागे असलेल्या गल्लीमधील डांगे नामक व्यक्ती,जिवतोडे, व इतर आजूबाजूचे नागरीक बाहेर गावी गेल्यामूळे त्यांच्या गेट कूलूप लावून असता दिनांक 20/11/2023 काल गावावरून परत आल्यानंतर त्यांचा कूलप तूटून दिसल्यामूळे वार्ड मध्ये त्यांनी आजूबाजूच्या नागरीकांना आपल्या वार्ड चोर आले त्यांनी कूलप तोडले पण घराचा दरवाजाचा कूलूप मजबूत असल्यामूळे चोरांना तोळता आला नसल्यामूळे दरवाजा निघू शकला नाही असं त्यांनी वार्डातील नागरीकांना सांगीतल.अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे.या घटनेची पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आलेली नाही. मात्र, अशा प्रकारे घरफोडीचा प्रयत्न फसल्याचे प्रकार शहरात अन्य ठिकाणी देखील घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरासह ग्रामीण भागातही चोरट्यांचा सुळसुळाट सातत्याने सुरु आहे. चोरट्यांची नजर कुलूपबंद घरावर असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतशिवारात मोटारपंप चोरीचे प्रमाण सातत्याने वाढले आहे.
ऐन रब्बी हंगामाच्या पेरणीच्यावेळीच मोटारपंप चोरुन नेले जात असल्याने शेतकऱ्यांतही चिंतेचे वातावरण पसरले आहे.दिवाळीपर्व तसेच मंडई उत्सावाची धामधूम सुरु आहे.
तसेच शाळांना सुट्टया लागल्या आहेत. त्यामुळे अनेकजण स्वगावी तसेच आप्तस्वकियांच्या गावी जात आहेत. शिवाय कुणी विविध कामानिमित्त तर काही कार्यक्रमानिमित्ताने जात आहेत. कुणी पर्यटनस्थळी, तिर्थस्थळी जात असल्याने अनेकांच्या घराला कुलूप लागले आहेत.
नेमके कुलूपबंद घर हेरुन घरफोडी केली जात आहे. घरातील सोन्या-चांदीचे दागिने व नगदी रक्कम चोरुन नेले जात असते. बसस्थानकावरुन गर्दीचा फायदा घेऊन खिशातून पाकीट हातसफाईने काढले जातात.