डाँ. सौरभ कवठे यांचे पशुधन विकास अधिकारी गट अ या परीक्षेत सुयश 

54

 मूल : स्थानिक पंचायत समिती मधील कनिष्ठ लेखा अधिकारी सदानंद कवठे यांचा मुलगा डाँ. सौरभ कवठे यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा व्दारे २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या पशुधन विकास अधिकारी गट अ या परीक्षेत यश संपादन केले आहे.

सामान्य परीवारातील डाँ. सौरभ याने जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करून पदापर्यत मजल मारली आहे. चंद्रपूर येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुर्ण केल्यानंतर नागपूर येथील शासकीय पशु वैद्यकीय महाविद्यालय येथुन पदवीचे शिक्षण पुर्ण केले.

उदगीर येथील महाविद्यालया मधुन न्युट्रीशिअन या शाखेत पदव्युत्तर अभ्यासक्रम पुर्ण केले आहे. डाँ. सौरभ सध्या मुंबई येथील एका खाजगी कंपनी मध्ये सेवारत आहे. डाँ. सौरभने प्राप्त केलेल्या यशाबद्दल मिञ परीवारात अभिनंदन केल्या जात आहे.