मूल येथे ओबीसी जागर यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद@ओबीसींना न्याय देण्याचे खरे कार्य भाजपाच करीत आहे. – डॉ. आशिष देशमुख

63

ओबीसींना न्याय देण्याचे खरे कार्य भाजपाच करीत आहे.
– डॉ. आशिष देशमुख

• मूल येथे ओबीसी जागर यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद.
• डॉ. आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी जागर यात्रा.

मूल: —

संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण करणाऱ्या भाजपाच्या ओबीसी जागर यात्रेतर्फे आज तिसऱ्या दिवशी दिनांक 4 ऑक्टोबरला मूल येथील गांधी चौकात सायंकाळी 7 वाजता जनसंपर्क आणि भव्य ओबीसी जागर मेळावा घेण्यात आला. भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी माजी आमदार डॉ. आशिष देशमुख, व प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांच्या कुशल नेतृत्वात ओबीसी जागर यात्रा संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत करीत आहे. 2014 पासून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाची सत्ता आल्यानंतर ओबीसींसाठी कल्याणकारी योजना राबवण्यासाठी सर्वप्रथम ओबीसी मंत्रालयाची स्थापना केली व आतापर्यंत हजारो कोटींचा निधी देऊन ओबीसींसाठी विशेष भरीव कार्य करीत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ओबीसींना न्याय देण्याचे कार्य भाजपा सरकार करीत आहे.
उद्धव ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षणाची वाट लावली. कॉंग्रेस जनतेची दिशाभूल करीत आहे. १२ बलुतेदार ओबीसीमध्ये येतात. ऑगस्ट २०२३ च्या जीआर नुसार पदभरतीमध्ये आरक्षणाचे निकष लावून पदभरती व्हावी, ही अपेक्षा आहे. मोदीजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने आणि राज्यातील महायुती सरकारने जनतेच्या हितासाठी अनेक चांगली कामे केली आहेत. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत ३ लाखांपर्यंत कर्ज मिळणार, ही फार महत्वाची गोष्ट आहे.” त्यांनी या ओबीसी जागर यात्रेची स्तुती केली.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील ९ वर्षातील कार्यामुळे आणि राज्यातील महायुती सरकारच्या प्रयत्नांमुळे चंद्रपूर जिल्ह्यात मोठा विकास झालेला बघायला मिळत आहे. सर्वांगीण विकासाचे कार्य या भाजपा सरकारमुळे सर्वत्र होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात नाम. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकास कार्यामुळे जिल्ह्यात मोठी रोजगार निर्मिती होणार आहे. ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी भाजपाने अनेक योजना राबविल्या आहेत. त्या महत्वाकांक्षी आणि विकासाभिमुख योजनाची माहिती ओबीसी समाजाला मिळावी, म्हणून या ओबीसी जागर यात्रेचे आयोजन आहे. ओबीसी-कुणबी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार नाही. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, ही भाजपाची भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील जनतेची दिशाभूल करीत आहेत. खरे म्हणजे राज्य सरकारने त्यांना ओबीसी आणि मराठा आरक्षणासंदर्भात काहीच आश्वासन दिलेले नाही. मराठ्यांना मिळालेलं आरक्षण उद्धव ठाकरे सरकारमुळे गेले. विजय वडेट्टीवार हे ओबीसी विभागाचे मंत्री असतांना येथील शेतकरी ,भूमिधारक व ओबीसींसाठी काय केले हा मोठा प्रश्न आहे. ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम त्यांनी केलं. चंद्रपूर जिल्ह्यात सरकारी नोकर भरतीसाठी भाजपा प्रयत्न करेल. ओबीसींसाठी वैद्यकीय शिक्षणात आरक्षण आणि नि:शुल्क वसतिगृहाचा लाभ भाजपा सरकारने मिळवून दिला आहे. ओबीसींसाठी सरकार स्वाधार व महाज्योती योजना राबवित आहे. या योजनांचा हजारो विद्यार्थी लाभ घेत आहेत. भाजपा ओबीसींचा आणि ओबीसी भाजपाचा हा आमचा मूलमंत्र असून ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. ‘भाजपाचा निर्धार, ओबीसींचा करू उद्धार “या तत्वावर भाजपा काम करीत आहे. राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यपालन मंत्री सुधीर मुनगंटीवार या क्षेत्राचे आमदार असून त्यांनी मूल सह बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचा प्रचंड चौफेर विकास करून चेहरामोहरा बदलवून टाकला आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी सिंचना सह अनेक विकासाची कामे केलेली आहेत. राम मंदिराच्या बांधकामासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील लाकूड गेले ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. यात्रेदरम्यान काही परीट, नाव्ही, शिंपी, सोनार आदी व्यावसायिकांशी मी प्रत्यक्ष भेटून त्यांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे महत्व समजावून सांगितले. या योजनेतून ओबीसी समाजाची मोठी प्रगती होणार आहे. त्यांच्यासाठी १० लाख घरकुलांसाठी शासनाची योजना तयार आहे. कॉंग्रेस राजकारण करीत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे ते काहीतरी बोंबा ठोकत आहेत. महाराष्ट्र राज्यात बिहारच्या धर्तीवर जातीनिहाय सर्वेक्षण व्हावे, या माझ्या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. यामुळे ओबीसींच्या विकासाला गती मिळेल”, असे प्रतिपादन भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी मूल येथे केले. याप्रसंगी ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा ओबीसी मोर्चा मूल शहराध्यक्ष युवराज चावरे यांनी केले. त्यांनी ओबीसी जागर यात्रेचा उद्देश विषद केला.
यावेळी संध्याताई गुरनुले, जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा प्रा. रत्नमाला भोयर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सदस्य आशिष देवतळे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. आशिष देशमुख पुढे म्हणाले,भाजपाने ओबीसी समाजासाठी ज्या योजना सुरु केल्या आहेत, त्याबद्दल त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांनी ओबीसींच्या कल्याणासाठी अनेक योजना आखल्या असून त्याचा १००% फायदा ओबीसी समाजाला होणार आहे. भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी यावेळी ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी भाजपाचे कार्य विषद केले. ते म्हणाले काँग्रेसने गेल्या 70 वर्षात ओबीसी समाजासाठी काहीच केलेले नाही. ओबीसींसाठी मंडल आयोग माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वात गैरकाँग्रेसी सरकारने लागू केले. ओबीसी आरक्षणावर बोलण्याचा काँग्रेसचा काही अधिकार नाही. ओबीसींच्या विकासाचा व उत्कर्षाचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळापासूनच होत आहे. देशात प्रत्येक घरी शौचालय निर्मिती, महिलांसाठी 45 कोटी जनधन खाते, उज्वला गॅस योजना, आयुष्यमान भारत योजना, सैनिकी शाळा व शेकडो योजना निर्माण केल्या. दलित आदिवासी, मुस्लिम व अल्पसंख्यांक, गरीब व बहुजनवर्ग याचा लाभ घेत आहेत. महाज्योतीच्या मोफत प्रशिक्षणातून 176 तरुण अधिकारी बनलेले आहेत. ओबीसींच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा संकल्प करणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे. ओबीसींचा विचार केवळ भाजपाच करू शकते. भाजपाचा डीएनए हा ओबीसीच आहे असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
व्यासपीठावर प्रदेश संपर्कप्रमुख व यात्रा प्रमुख रवींद्र चव्हाण, प्रदेश सचिव नितीन गुडधे पाटील, वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल,माजी आमदार सुदर्शन निमकर, नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर, प्रदेश उपाध्यक्ष डी. डी. सोनटक्के, कमलाकर घाटोळे, पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख येनुरकर संगीता राऊत, रेखाताई डोळस, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, भाजपा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा, नगरपरिषद मूल माजी नगराध्यक्ष प्रा.रत्नमाला भोयर, आशिष देवतळे, भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अविनाश पाल,बल्लारपूर विधानसभा संघटनमंत्री राम लखिया, मूल शहर भाजपा अध्यक्ष प्रभाकर भोयर, माजी पंचायत समिती सभापती चंदू मारगोनवार , भाजपा मूल शहर सरचिटणीस चंद्रकांत आस्टनकर , माजी नगरसेवक महेंद्र करकाडे , माजी नगरपरिषद उपाध्यक्ष प्रवीण मोहुर्ले, माजी नगरसेवक अनिल साखरकर, भाजपा ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष दादाजी येरणे ,भाजपा ओबीसी मोर्चा मूल शहर अध्यक्ष युवराज चावरे, भाजपा ओबीसी युवा मोर्चा अध्यक्ष राकेश ठाकरे, किशोर कापगते व इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शेकडोंच्या संख्येत नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. भव्य जनसंपर्क पदयात्रेमुळे मूल येथे नव-चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून एकच जल्लोष केला व भाजपा ओबीसी जागर यात्रेचे स्वागत केले. कार्यक्रमानंतर ही ओबीसी जागर यात्रा मूल वरून चंद्रपूरकडे रवाना झाली.
भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी डॉ. आशिष देशमुख आणि भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांच्या नेतृत्वात ओबीसी जागर यात्रा महाराष्ट्र पादाक्रांत करीत आहे.
ओबीसी जागर यात्रेची सुरुवात ०२ ऑक्टोबर २०२३ ला हिंगणघाटपासून झाली असून यवतमाळ, गडचिरोली, सावली, मूल, चंद्रपूर, गोंदिया, रामटेक, काटोल, अकोला, शेगाव, वाशीम असा हा मार्ग राहील. ही यात्रा पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील ११ही जिल्हे पादाक्रांत करेल. पहिल्या टप्प्याचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पोहरादेवी, जि. वाशीम येथे १२ ऑक्टोबर २०२३ ला होईल. नवरात्री नंतर उत्तर महाराष्ट्रात ही यात्रा सुरु राहील. भाजपा सत्तेत असून राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या हितासाठी ज्या योजना राबविल्यात आणि जे कार्य केले, त्याबद्दल ओबीसी समाजाला माहिती मिळावी, हा या ओबीसी जागर यात्रेचा प्रमुख उद्देश आहे. जनतेने मोठ्या प्रमाणात या यात्रेत सहभागी व्हावे आणि ओबीसींचा आवाज बुलंद करावा, असे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केले आहे. कार्यक्रमाचे संचालन माजी नगरसेवक महेंद्र करकाडे यांनी केले. उपस्थितांचे आभार भाजपा ओबीसी मोर्चा युवा अध्यक्ष राकेश ठाकरे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.