मुल नगरपरीषद अंतर्गत@स्वच्छता अभियान संपन्न

74

मुल नगरपरीषद च्या माध्यमातून रविवारी (दि.१) श्रमदान मोहीम उत्साहात राबविण्यात आली. श्रमदान मोहिमेअंतर्गत  स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले होते. स्वच्छता अभियानात लोकप्रतिनिधी, नगरपरीषद अधिकारी, कर्मचारी,  संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक सहभागी झाले होते.हातांनी मिळून आठवडी बाजार स्वच्छ केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोंबर रोजी देशभर श्रमदान मोहीम राबविण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार एक तास श्रमदान करण्याचे नियोजन करण्यात आले. नगरपरीषद च्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.  प्रशासनाच्या माध्यमातून सर्वांनी श्रमदान मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याचे दृश्य परिणाम आज पहावयास मिळाले.  उत्स्फूर्तपणे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

स्वच्छता अभियान अंतर्गत सार्वजनिक परिसर, सोमनाथ रोड ते गांधी चौक बाजार,  परिसर यासह इतर ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जमा करण्यात आलेला कचरा नेण्यात आला. तसेच सर्वत्र नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.आज सर्वत्र श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रमदान ही एक चळवळ म्हणून सर्वांनी कायम ठेवली पाहिजे. सर्वांनी मिळून पृथ्वी, जल, वायू स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासोबत सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. : मुख्याधिकारी यशवंत पवार,नगरपरीषद मुल