महसूल विभागाच्या शासकीय जागेवर अतिक्रमण करून आपल्या निवासाची सोय करणाऱ्यांना कायमस्वरूपी पट्टे वाटपाचा शुभारंभ नुकताच मूल शहरातील एका कार्यक्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते करण्यात आला , याप्रसंगी १६४ लाभार्थ्यांना कायमस्वरूपी पट्टे वाटप करण्यात आले आणि उर्वरित लाभार्थी अतिक्रमण धारकांच्या कागदपत्रांच्या पूर्ततेच्या आधारे उर्वरित लाभार्थींना अतिक्रमण केलेल्या जागा वाटपाचा कार्यक्रम मिशन मोडवर राबविण्यात येणार असल्याचे स्पष्टिकरण नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या वक्तव्यातून केले होते.
अस्वस्थ लाभार्थी आम्हाला पट्टे वाटप कधी केले जाणार अशी विचारणा , सभास्थानी सुधीर मुनगंटीवार यांच्या समवेत करु लागले, आणि दुसऱ्या दिवसापासून पट्टेवाटपात नंबर न लागलेले अतिक्रमण धारक कुणी अधिकाऱ्यांना साकडे तर कुणी राजकीय नेतेमंडळींकडे चकरा मारु लागलेत,तर कुणी उच्चाधिकारी वा प्रत्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेच निवेदन देण्याचा व आपल्या मागण्या पुढे रेटण्याचा प्रयत्न करु लागलेत .
असेच रविवारी सकाळी मूल वार्ड क्रमांक १४&१५मधिल काही अतिक्रमण धारकांनी एकत्र येत सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली व निवेदन देत आपली कैफियत पालकमंत्री यांचेसमक्ष मांडली तेव्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या स्वाक्षरीने एक पत्र जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पाठविले आणि अर्जदारांना प्रत देत एक प्रत तहसीलदार मूल यांना देण्यासाठी अर्जदारांना दिली .
तीच प्रत आज सोमवारी सकाळी अर्जदारांनी तहसीलदार मूल यांना सादर केली व आपल्या मागण्या समजावून सांगितल्या, याप्रसंगी प्रस्तुत प्रतिनिधी तहसील कार्यालयात उपस्थित होते ,अर्जदारांनी आपली मागणी त्यांच्या समोर ठेवली व आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली.
एकुणच काय एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला चांगलेच कष्ट घेऊन आणि प्राधान्यक्रम ठरवून कार्य करावे लागणार असल्याचे दिसत असून यात आरोपांचा सामना करावा लागणार आहे.
अशोक किर्तिवार,दादाजी गजबे व वार्डातील इतर महिला व पुरुष यांनी आज दिनांक २५/०९/२०२३रोजी तहसीलदार डॉ रविंद्र होळी यांना हे निवेदन सादर केले , आपल्या निवेदनात ते म्हणतात, आम्ही मौजा रामपूर तुकूम या मूल शहरातील गावठाणातील रहिवासी असून, आम्ही ४०-४५ वर्षांपासून येथेच राहात आहोत , नगरपरिषदेचा कर , पाणीकर व इतर करांचा नियमित भरणा करीत आहोत, वीजेचे मिटर सुद्धा प्राप्त झाले आहे मात्र आम्हाला स्थायी पट्टा न मिळाल्याने अडचणीचे ठरत असून नगरातील काही लोकांना नुकतेच घराच्या जागेचे पट्टे वाटप करण्यात आले असून ते आम्हाला तातडीने मिळण्यात अडचण जात आहे परिणामी ही अडचण लक्षात घेऊन स्थायी पट्ट्याचे तातडीने वाटप केले जावे अशी मागणी केली आहे.