मूल तालुक्यातील ई केवायसी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या@2558  शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित तत्काळ कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन

44

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळावा, यासाठी तालुका कृषी विभागाच्या वतीने संबंधित पात्र शेतकऱ्यांची ई- केवायसी नोंदणी प्रक्रिया राबविली जात आहे. तालुक्यात अद्यापही 2558 शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी तत्काळ कागदपत्रांची पूर्तता करीत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे.

पंतप्रधान किसन सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनाद्वारे व राज्य शासनाद्वारे पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी 6 हजार रुपयांचा निधी प्रदान केला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खात्याला आधार लिंक करणे नितांत गरजेचे आहे. तालुका कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात पात्र लाभार्थी मात्र मृत पावलेल्या शेतकऱ्यांची संख्या  एवढी आहे. तसेच तालुक्यातील ई- केव्हायसी अपडेट नसलेल्या शेतकऱ्यांची संख्या  बाहेरगावी असलेले , वयोवृद्ध व आजारी शेतकरी , असे तालुक्यातील एकूण 2558 पात्र शेतकऱ्यांची अद्यापही केवायसी नोंदणी प्रलंबित आहेत.

संबंधीत ग्रामपंचायत, सिएसी केंन्द्र,कृषी विभाग यांच्याकडे मूल तालुक्यातील ई केवायसी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या बघू शकतात.ई केवायसी शेतकऱ्यांनी तत्काळ कागदपत्रांची पूर्तता करीत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे.

शासनाचा 15 वा हप्ता प्राप्त होण्याकरिता तालुक्यातील शेतकऱ्यांनी तत्काळ कागदपत्रांची पूर्तता करुन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे.