*”मोहपुरी” व “मोहचटणी” चा मिळेल स्वाद.
चंदपूर /मूल.
इतिहास जमा झालेली परंपरागत मोहपुरी व मोहचटणी पुन्हा नव्याने
पौष्टीक आहार म्हणून पुढे आणण्याचे
श्रेय तालुक्यातील फुलझरी ग्रामसभेने
लाटले आहे. स्वातंत्रदिनाच्या शुभपर्वावर पंचायत समिती मुल येथे
फुलझरी वासियांनी ही वन मेजवानी
जनतेपुढे आणून विक्री साठी उपलब्ध
केली.
फुलझरी वासियांचा पुढाकार यासाठीही कौतुकास्पद समजला जातो
कारण यामुळे आपल्या संस्कृतिचे जतन व सोबतच वनांवर आधारीत उत्पादनापासून
अन्न निर्मिती व विक्रीला यातून चालना
मिळणार आहे. परंपरागत अन्न हे पोष्टिक तत्वांनी परिपुर्ण व च दिष्ट असायचे,ऐवढेच नाही तर स्थानिकांना
यासंबंधी खोलवर ज्ञान व कला अवगत आहे.फुलझरी वासियांनी
“मोहपुरी” व “मोहचटणी” ची प्रदर्शनी
व विक्री करून ग्रामसभा फुलझरी ने
आपली संस्कृती व परंपराचा जिवंतपणा पुढ्यात आणला आहे.या प्रदर्शनीतून परंपरागत अन्न प्रक्रियेबाबत जनजागृती सोबतच परंपरागत अन्न निर्मितीबाबत कौशल्य
पुढे आले आहे.सोबतच या परंपरागत
पोष्टिक तत्वानी भरलेल्या अन्न घटकांना यातून बाजारपेठेच्या संधी
उपलब्ध होता र असल्याचे मत यावेळी
अनेक मान्यवरांनी व्यक्त केले आहे.
वनसंसाधनाचा वापर करून संस्कृती,परंपरा जतन व सोबतच पर्यावरण संतुलन व जतन सुद्धा करण्यासंबंधाने मोठी जनजागृती
होण्यास मदत होणार आहे.
इतिहासजमा झालेल्या पोष्टिक मोहपुरी
व मोहचटणी चा स्वाद या प्रदर्शनीत
जनतेनी घेतला या अन्न घटकांना आता
बाजारपेठ खुली झाली.हे सारे श्रेय फुलझरी वासियांना जाते.सोबतच
मूल चे तहसिलदार डा. रविन्द्र होळी
यांनी पुढाकार घेऊन मोहझरी ग्रामसभेला संधी उपलब्ध करून देऊन
अभिनंदनास पात्र ठरले आहेत.
आता जिल्हा व राज्यस्तरावर मोहपुरी
व मोहचटणी ला व्यासपिठ उपलब्ध
करून दयावी ही फुलझरी वासियांची
मागणीवजा विनंती आहे.यातून आर्थिक स्वयतत्ता ग्रामस्थांना लाभणार
आहे हे निश्चित.