शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिक जातात तेव्हा पार्किंग नसल्यामुळे त्यांच्या दुचाकी चोरीचा धोका वाढला आहे. मागील 15 दिवसात बुधवारी तहसील पाॅर्कीग मधील टू व्हिलर फोशन MH34,BP 4897 पो मालक- प्रमोद मशाखेत्री ची गाडी चोरीला गेली तर आता बेरोजगार लाईन,फीटींगचे घरगुती कामकरण्यासाठी जाणारा बेरोजगार युवक नितेश निकोडे यांची बुधवारी MH-34 , V5726 मुल बाजारातून गाडी चोरीला गेली आहे दोन्ही गाडया बुधवारी गेलेल्या आहेत मुल पोलीस स्टेशन मध्ये अज्ञान वाहन चोराविरोध गुन्हा दाखला केलेला आहे.
शहरात वाहनचोरीचे प्रकार सुरूच आहे; मात्र वाहन चोरांचा छडा लावण्यात पोलिस प्रशासनाला अपयश आले असल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
ही वाहने चोरीला गेल्याच्या तक्रारी संबंधित मुल पोलिस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत. शहरात वाहने चोरीला जाण्याचे प्रकार वाढत असून, त्याला आळा घालण्यामध्ये पोलिस प्रशासनाला यश मिळत नसल्याचे चित्र आहे. आठवड्यामध्ये चोरील जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढतच असून त्यावर नियंत्रण ठेवण्यामध्ये पोलिस प्रशासन हतबल ठरले आहे.
मुल पोलिस प्रशासनाने तातडीने वाहनचोरांचा छडा लावून त्यांना बेड्या ठोकाव्यात, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
तहसील कार्यालय,बाजारपेठ येथील दुकानदारांची, पंधरा दिवसांत ग्राहकांची वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले असून, येथील वाहने चोरट्यांचे टार्गेट बनत असल्याने स्थानिक नागरिक व दुकानदार प्रचंड नाराज झाले आहेत.
पार्किंगची सोय नसल्याने लोकांना जागा मिळेल तिथे वाहने लावावी लागत आहेत. बाजार संकुलात दररोज शेकडो लोक ये-जा करतात. अशा परिस्थितीत त्यांना दररोज पार्किंगच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर पार्किंगबाबत व्यापाऱ्यांनी नगरपालिका प्रशासनालाही कळविले आहे. वर्षांनंतरही तोडगा निघाला नाही.
वाहने चोरीला गेली, ज्यांचा ठावठिकाणा आजतागायत कळू शकलेला नाही.
मुल शहराचा तिसरा डोळा बंद; सीसीटीव्हीचा लाखोंचा खर्च निरुपयोगी
शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर, घडामोडींवर लक्ष ठेवता यावे या हेतूने मुल शहरात सीसीटीव्ही लावण्यात आले. परंतु, सध्या शहरातील गांधी चैकातील कॅमेऱ्यांपैकी सीसीटीव्ही बंद अवस्थेत आहेत.
निवडक ठिकाणी वेगळे सीसीटीव्ही आहेत. त्यामुळे शहरातील पोलिस कर्मचाऱ्यांना तपास पूर्ण करतांना कसरत करावी लागत आहे. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सुगावे शोधण्याकरिता खासगी व्यापारी प्रतिष्ठानांच्या बाहेर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
शहरात विविध ठिकाणी बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांअभावी सुरक्षा यंत्रणांची दमछाक होत आहे. शहर सीसीटीव्ही कॅमेऱ्याविना राहिले प्रसारमाध्यमांच्या दबावामुळे मुल न.पलिकेने शहरातील काही प्रमुख भागात सीटीव्ही लावले होते. सीसीटीव्ही काही ठिकाणी बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे शहरात शांतता, सुव्यवस्था व सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता आहे.