शासन पीक विमा काढा म्हणतंय, पण… ‘आपले सरकार’ केंद्रावर सर्व्हर डाऊन, शेतकऱ्यांना हेलपाटे

64

 शासन शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी विविध प्रकारच्या जाहिराती करीत आहेत. कोणताही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहू नये, याकरिता एक रुपयात पीक विमा शेतकऱ्यांसाठी जाहीर केला. शासन स्तरावर खूप प्रयत्न केले जातात. परंतु सेतू केंद्रावर गेल्यावर शेतकऱ्यांना सर्व्हर डाऊन असल्यामुळे सातबारा, ८- अ वेळेवर मिळत नाही.
मुल तालुक्यातील सुशी दाबगाव येथील  आपले सरकार सेवा केंद्रावर दोन दिवसांपासून शेतकरी गेले असता, केंद्र संचालक त्यांना सर्व्हर डाऊन असल्याचे सांगत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीचे काम सोडन सेत् केंद्रावर हेलपाटे मारावे लागत आहे. पीक विमा काढण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट जवळ येत असल्यामुळे सेतू केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.
शेतकरी पीक विमा काढण्यासाठी येतात. आम्ही सुद्धा शेतकऱ्यांकरिता रात्री  उशिरापर्यंत काम करतो. परंतु सव्र्व्हर डाऊन असल्यामुळे आमचाही  नाईलाज आहे.
-प्रतीक गेडाम, केंद्र चालक, आपले सरकार सेवा केंद्र, सुशी दाबगाव