अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ@अतिवृष्टीचा तलाठी भरतीवर परिणाम

64

महसूल विभागातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी 26 जून पासून उमेदवारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज स्विकृतीची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली होती. अर्ज करण्यात 18 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती मात्र अतिवृष्टीने ऑनलाईन अर्ज करण्यास 25 जुलै 23. 55 वाजतपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्यातील तलाठी पदभरती करीता 26 जून पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली त्यास 17 जुलै पर्यंत 23.55 वाजता पर्यंत मुदत होती मात्र त्यात एका दिवसाची वाढ देऊन 18 जुलै च्या 23.55 वाजता पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान या काळात अनेकांनी अर्ज दाखल केले. मात्र आता राज्यात सुरु असणाऱ्या अतिवृष्टीमुळे इंटरनेट सेवा प्रभावित झाल्याने दुर्गम भागातील (PESA क्षेत्रातील) व इतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी निर्माण झाल्याबाबत निवेदन शासन स्तरावर प्राप्त झाल्याने तलाठी भरतीच्या सर्व उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन शुल्क जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज व ऑनलाईन शुल्क हे 25 जुलै रात्रो 23.55 वाजेपर्यंत सादर करता येणार आहे. त्यामुळे उमेदवारास काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

जाहिरात क्र.: तलाठी भरती/प्र.क्र./45/2023

Total: 4644 जागा

पदाचे नाव: तलाठी (गट-क)

अ.क्र. जिल्हा पदांची संख्या अ.क्र. जिल्हा पदांची संख्या
1 अहमदनगर 250 19 नागपूर 177
2 अकोला 41 20 नांदेड 119
3 अमरावती 56 21 नंदुरबार 54
4 छ. संभाजीनगर (औरंगाबाद) 161 22 नाशिक 268
5 बीड 187 23 धाराशिव (उस्मानाबाद) 110
6 भंडारा 67 24 परभणी 105
7 बुलढाणा 49 25 पुणे 383
8 चंद्रपूर 167 26 रायगड 241
9 धुळे 205 27 रत्नागिरी 185
10 गडचिरोली 158 28 सांगली 98
11 गोंदिया 60 29 सातारा 153
12 हिंगोली 76 30 सिंधुदुर्ग 143
13 जालना 118 31 सोलापूर 197
14 जळगाव 208 32 ठाणे 65
15 कोल्हापूर 56 33 वर्धा 78
16 लातूर 63 34 वाशिम 19
17 मुंबई उपनगर 43 35 यवतमाळ 123
18 मुंबई शहर 19 36 पालघर 142

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखे मधून पदवी.

वयोमर्यादा: 17 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी करण्यासाठी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

शुल्क: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय:₹900/-]

Online अर्ज करण्या साठीची शेवट तारीख: 25जुलै 2023 (11:55 PM)

परीक्षा:नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

Online अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा