मुल येथे त्वरित बस आगर मंजूर करावे. नागरिकांनी मा.मुख्यमंत्र्याकडे तहसीलदार यांचे मार्फत केली मागणी

77

मुल – मूल हे चंद्रपूर जिल्हयातील अतिशय महत्वाचे शहर आहे. मूल हे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांची कर्मभूमी असून, विद्यमान मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे मुळगांव आहे.
मूल येथे बस आगार नसल्यांने, मूल तालुक्यातील जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
सद्यस्थितीत मूल येथील बस स्थानकांवर गडचिरोली, ब्रम्हपुरी व चंद्रपूर बस आगारातून कार्य चालत आहे. यामुळे प्रवाशाना अपुरे बस मुळे अडचणी निर्माण होत आहे. प्रासंगीक बसेस करीता अधिकची रक्कम भरावी लागत आहे. अपुरे बसेसमुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थाना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत असून, वारंवार आंदोलने केली जात आहे.
मूल नगर परिषदेने बस आगाराकरीता जागा आरक्षीत केलेली असून त्या आरक्षित जागेवर मूल येथे तातडीने बस आगार मंजूर करावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांचेकडे मुल तहसीलदार यांचे मार्फतिने केली आहे.

तहसीलदार यांना निवेदन देताना श्रमिक एल्गार सचिव विजय सिद्धावार,पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू गेडाम, एम टू एम डिजीटल न्यूज पोर्टल चे संपादक दिपक देशपांडे,मुल लाईव डीजीटल न्यूज चे संपादक अमीत राउुत,पि.एम डीजीटल न्यूज चे संपादक प्रमोद मशाखेत्री,प्रा. संजय येरोजवार,नीलेश राय,संदीप मोहबे, कैलाश चलाख, नलिनी आडपवार यांचेसह अनेक नागरिक उपस्थित होते.