प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार संत तुकडोजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय चिखली, तालुका मुल जिल्हा चंद्रपूर नुकत्याच जाहीर झालेल्या नागपूर विभागीय मंडळाचा निकाल जाहीर झाला त्यात वर्ग बारावी मध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यात कुमारी तेजस्विनी थांमदेव राऊत ८३.८३ टक्के प्रथम कुमारी धनश्री वेनुदास झरकर 83.17 टक्के द्वितीय कुमारी धनश्री भोजराज दंडीकवार ८१.१७ टक्के तृतीय या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून संस्थेच्या कार्यालयात संस्था अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक श्री विठ्ठल राव चौथाले सचिव सौ वंदना व्ही. चौथाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्राचार्य श्री आर एच रामटेके प्राध्यापक दुर्वास कळस्कर प्राध्यापक वाय. डी. रामटेके हे उपस्थित होते. पुढील उच्च शिक्षण घेताना कोणत्याही अडचणी आल्या त्यावर मात करीत आपल्या गुरुजनांचा आदर्श पुढे ठेवावा असे मत प्राध्यापक डॉक्टर विठ्ठलराव चौथाले सर यांनी व्यक्त केले. व पुढील शिक्षणाकरिता शुभेच्छा दिल्या संत तुकडोजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालयात चिखली येथे एकूण 35 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते व 35 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि निकाल शंभर टक्के लागला यामधे 14 विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाल्याबद्दल व उत्तम निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल प्राचार्य व प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले यावेळी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.