जवाहर नवोदय विद्यालयातील वर्ग सहावीत प्रवेश मिळण्याकरिता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली होती. आता शनिवारी परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून याकरिता विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता.
सर्वसामान्य परिवारातील होतकरू विद्यार्थ्यांना मोफत व निवासी शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी, याकरिता जवाहर नवोदय विद्यालयाची निर्मिती केली आहे. नवभारत विद्यालय तळोधी येथे नवोदय विद्यालय असून या विद्यालयात सहावीच्या प्रवेशाकरिता दरवर्षी प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाते.
पाचवीत असलेले विद्यार्थी या परीक्षेकरिता अर्ज भरत असतात. यावर्षी
मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी अर्ज केला असून 29/04/2023 आज शनिवारी या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाणार आहे.
त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेचे ओळखपत्र घेऊन निर्धारित वेळेच्या आधीच परीक्षा केंद्रावर पोहोचावे, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 246