मूल येथील घटना@प्रेयसीवर पेट्रोल टाकून प्रियकराची आत्महत्या

598

मूल, ता. २४ : प्रेयसीवर पेट्रोल टाकून व नंतर प्रियकराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी मूलमध्ये घडली. या घटनेने मूल मध्ये खळबळ उडाली आहे.
गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या मृतकाचे नाव बंडू उर्फ रामचंद्र निमगडे (वय ४५) असे असून तो वार्ड क्र. ११ मध्ये राहतो. बंडू विवाहित असून त्याच्या घरी पत्नी व एक मुलगा आहे. बंडूचे शेजारीच राहणाऱ्या एका विवाहितेशी बऱ्याच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. बंडू व त्याची प्रेयसी या दोघांनाही एक एक मुलगा असून यांच्या प्रेमसंबधाची नेहमीच चर्चा व्हायची. त्यामुळे बंडूचे घरी पत्नीसोबत नेहमी भांडणे व्हायची.
नेहमीच्या भांडणामुळे तणावात असलेला बंडू सोमवारी दुपारी शेजारी प्रेयसीच्या घरी गेला व तिच्या अंगावर पेट्रोल टाकले. तेथून तो घरी परत आला व घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना दुपारी दोन वाजताच्या दरम्यान घडली. पेट्रोल टाकल्याने अस्वस्थ घाबरलेल्या प्रेयसीला पोलिसांनी इस्पितळात नेले. तेथे तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला चंद्रपूर येथे पुढील उपचारार्थ हलविण्यात आले आहे.
दरम्यान, घटनास्थळी जिल पोलिस अधीक्षक यांनी भेट दिल
पेट्रोल टाकून हत्येचा प्रय केल्याने पोलिसांनी मृत बंडू निम‍ यांच्याविरुद्ध ३०७ चा गुन्हा दाखल झाला असून आत्महत्या प्रकरणी मर्ग दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास प्रभारी ठाणेदार बनसोड हे करीत आहेत.