मुल येथे सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला अभूतपूर्व प्रतिसाद@ सरकारी कार्यालये पडली ओस

106

विद्यार्थी शेतकरी यांचे कामे खोडांबली

मुल येथे सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला अभूतपूर्व प्रतिसाद@ सरकारी कार्यालये पडली ओस
या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका सर्व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

     यांच्यासह शहरातील विविध शासकीय कार्यालयातील हजारो कर्मचारी सरकारी, निमसरकारी, शिक्षक – शिक्षकेतर, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायत, आरोग्य विभाग, वनविभाग कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या समन्वयातून आज तहसिल कार्यालय मुल येथे कर्मचार्‍यांच्या एकुण १८ मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला . यामध्ये सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, तहसिल कार्यालय, पंचायत समिती, आरोग्य विभाग, वनविभाग, कृषी विभाग त्याचप्रमाणे अन्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपात १०० टक्के प्रतिसाद नोंदविलाया संपात सहभागी झाले आहेत.
        कर्मचाऱ्यांकडून तहसील कार्यालय परीसरातून पेन्शनच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.यात महिला कर्मचाऱ्यांचा सहभागी मोठय़ा प्रमाणात होता. एकच मिशन, जुनी पेन्शनचा नारा देत कर्मचाऱयांनी मुल तहसील कार्यालय पासून तर गांधी चाौक तर पुन्हा तहसील कार्यालय परीसरात परत मोर्चा काढला, तर मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत कामावर न जाण्याचा निर्धार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱयांनी केला आहे. यामुळे तालुक्यातील शाळा बंद आहेत. शिक्षकही संपात सहभागी झाल्याने शाळा बंद राहिल्या. उद्याही शाळा सुरू की बंद यावरून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.आज राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य मोर्चा काढण्यात आला.
      कर्मचाऱयांनी राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत, मोर्चाचा मार्ग दणाणून सोडला. सुरू झालेला मोर्चा प्रमुख मार्गावरून पुन्हा आला. तहसील कार्यालय मुल येथेच मोर्चाची सांगता करण्यात आली. कर्मचारी संपावर गेल्याने सर्व कार्यालयात शुकशुकाट होता. मात्र, अधिकारी उपस्थित होते. सरकार पेन्शन देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने – तहसील कार्यालय परीसरात ठिय्या मारून निदर्शने केली. सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी मूल तालुका जुनी पेंशन कृती समिती चे वतीने रॅली काढण्यात आली