एमबीए@एमएमएस सामाईक प्रवेश परीक्षेची ऑनलाईन नोंदणी सुरू

59

मुंबई,  : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत तंत्रशिक्षण विभागांतर्गत  एमबीए, एमएमएस या सामाईक प्रवेश परीक्षेची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया दि. २३ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होणार आहे. ही नोंदणी प्रक्रिया दि. ४ मार्च २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता घेण्यात येणाऱ्या एमबीए/एमएमएस या व्यावसायिक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महा- एमबीए/एमएमएस सीईटी २०२३ ही परीक्षा दिनांक १८ मार्च २०२३ व १९ मार्च २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी  https://mbacet2023.mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Important Dates
Schedule of Activities for Online Registration for MAH-MBA/MMS-CET-2023
Sr. No. Activity Schedule
First Date Last Date
1. Online registration for MAH-MBA/MMS-CET- 2023 on the website https://mbacet2023.mahacet.org 23/02/2023 10:00 am 04/03/2023

Note : The schedule given above is provisional and may change due to unavoidable circumstances. The revised schedule will be notified on website http://www.mahacet.org