मूल, 13 फेब्रुवारी : शेतशिवारात लाखोरी तोडण्यासाठी गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या अस्वलीने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना मूल तालुक्यातील मोरवाही येथे सोमवार 13 फेब्रुवारी रोजी सकाळच्या -सुमारास घडली. देवकाबाई पत्रुजी झरकर (55) रा. मोरवाही असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नांव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मोरवाही येथील देवकाबाई पत्रुजी झरकर व काही महिला या शेतातील लाखोरी तोडण्याकरिता गेल्या होत्या दरम्यान दबा धरून बसलेल्या अस्वलीने देवकाबाई झरकर यांच्यावर हल्ला करीत जखमी केले. सोबतच असलेल्या महिलांनी आरडा ओरड केल्याने अस्वलीने पळ काढला व मोठा अनर्थ टळला.
मात्र अस्वलीच्या हल्लात देवकाबाई झरकर हया गंभीर जखमी झाल्या, त्यांच्यावर मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूर रेफर करण्यात आल्याची माहीती आहे. घटनास्थळावर वनविभागाचे कर्मचारी दाखल होवुन पंचनामा केला आहे.
Post Views: 204