शिक्षकांच्या हक्कासाठी सहभागृहा बाहेरही लढेन: आमदार सुधाकर अडबाले @शिक्षण प्रसारक मंडळ मुल द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय सभागृहात

140

मुल -भाजपचा गड असलेल्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात झालेला माझा विजय हा प्रत्येकाच्या मनातील सरकारच्या विरोधात असलेला आक्रोश आहे. शाळा आणि शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना वेटीस धरण्याचे काम शासनाने केलेले आहे. 57 हजार जागा शिक्षकांच्या राज्यात रिक्त आहेत. अनेक शाळांमध्ये शिकवायला शिक्षक नाहीत. मराठी शाळांची अवस्था दयनीय आहे. जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा मागील अनेक वर्षापासून लढा सुरू आहे. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेसाठी शेवटपर्यंत आम्ही लढा देऊ. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी यापुढेही रस्त्यावर व सभागृहात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून लढा सुरू राहील, असे प्रतिपादन नवनिर्वाचित शिक्षक आमदार सुधाकर अडबाले ( Sudhakar Adbale) यांनी सत्कार सोहळ्याप्रसंगी केले.भाजप व महाविकास आघाडीच्या अस्तित्वाची लढाई झाली. भाजपचे राज्यस्तरीय नेते नागपूर चंद्रपूर आदी जिल्ह्यात शिक्षण संस्थेत भेटी दिल्या. प्रचार केला.
जुनी पेन्शन मिळून देई पर्यंत माझा लढा सुरु राहील. असे मत शिक्षक आमदार श्री सुधाकर अडबाले यांनी केले. शिक्षण प्रसारक मंडळ मुल द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय सभागृहात आयोजित स्वागत व सत्कार सोहळ्या प्रसंगी सत्कारमूर्ती म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते, शिक्षण व सहकार महर्षी एड. बाबासाहेब वासाडे प्रमुख अतिथी चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार बाळूभाऊ धानोरकर, संस्थेचे सचिव एड. अनिल वैरागडे, विजुक्ताचे अध्यक्ष श्री. खाडे सर, प्राचार्य डॉ.अनिता वाळके उपस्थित होते. शिक्षण संस्थेच्या वतीने आमदार सुधाकर अडबाले, खासदार बाळू धानोरकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सोबतच विमाशीच्या वतीने अनेक पदाधिकारी, शिक्षक, निवृत्त शिक्षक यांनीही आमदार अडबाले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले. तसेच मुल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, महिला काँग्रेस अध्यक्षा रुपाली संतोषवार, शहर काँग्रेस अध्यक्ष सुनील शेरकी व काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व राष्ट्रवादीचे विधानसभा प्रमुख सुमित समर्थ, तालुका अध्यक्ष प्रा किसन वासाडे व त्यांचे पदाधिकारी यांनीही आमदार खासदार मर्होदयांचे स्वागत केले.
प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना खासदार बाळू धानोरकर यांनी सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केल्याबरोबर अडबाले हे निवडून येणारं हे आम्ही ठरवले होते. यात काँग्रेसच्या जिल्हास्तरीय नेत्यांचे भरपूर सहकार्य मिळाले. एड.बाबासाहेब वासाडे हे शिक्षण व सहकार क्षेत्रातील महात्मा आहे. सर्वांना एकत्र करुन नेतृत्व करण्याचे बळ आजही त्यांच्यात आहेत. म्हणून हे यश मिळाले. पुढे कांग्रेसची सत्ता येईल असेही उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय भाषण एड.बाबासाहेब वासाडे यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
त्या सोडविण्यासाठी आमदार सुधाकर अडबाले व आमदार अभिजित वंजारी यांनी नक्कीच प्रयत्न करतील ही जबाबदारी त्यांचेवर आम्ही टाकली आहे. असे अध्यक्षीय मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव एड.अनिल वैरागडे यांनी केले, संचालन प्रा. डॉ. जी.एस. आगलावे यांनी केले तर आभार विमाशी संघटनेचे पदाधिकारी व काँग्रेस ओबीसी सेलचे राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनेक संस्थेतील प्राचार्य,मुख्याध्यापक, महाविद्यालयातील प्राध्यापक, विमाशी शिक्षक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, सर्व शिक्षक यांनी अथक परिश्रम घेतले. पंचायत राज प्रशिक्षण येथे स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाला महाविकास आघाडी राजकीय संघटनेचे पदाधिकारी, सरपंच, ग्रामिण कार्यकर्ते, शिक्षक संघटनेचे असंख्य शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.