कापड दुकानला भीषण आग, लाखेांचा माल जळून खाक

114

कापड दुकानला भीषण आग, लाखेांचा माल जळून खाक
मुल शहरातील अत्यंत वर्दळीच्या सोमनाथ रोड वरील बाजार परिसरात कापड दुकानाला भीषण आग लागल्याने लाखोंचा माल खाक झाली . ही घटना गुरूवारच्या रात्रैा 1 वाजताच्या सुमारास घडली. आग लागताच अग्निशमन पथक अवघ्या काही वेळातच घटनास्थळावर पोहोचून नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला,या घटनेत माल खाक झाल्याची माहिती आहे.

        सोमनाथ रोडवरील  येथील प्रसिद्ध तसेच सर्वात जुने ‘दत्त साडी सेंटर’ गोगिरवार यांच्या दुकानाला काल रात्री 1 च्या सुमारास आग लागली. आग कशामुळे लागली अद्यापही कळले नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी नगर परिषद मूल, आणि सावली येतील अग्नी शमन दल, ठाणेदार राजपूत साहेब, पोलीस कर्मचारी तथा नगर परिषदचे shio आणि कर्मचारी तसेच नगरसेवक प्रशांत समर्थ  नागरिकांच्या सहकार्याने आग आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली. यामध्ये गोगीरवार यांचे लाखोचे नुकसान झाले.