राज्यस्तरीय योजना या मधे दुधाळ गाय म्हशी वाटप, शेळी मेंढी गट वाटप. 1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाव्दारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरू करणे योजनेमधे निवड झालेल्या लाभार्थ्यांना आता कागदपत्रे अपलोड document upload करण्यासंदर्भात sms प्राप्त झालेले आहे कागदपत्रे कश्या प्रकारे अपलोड document upload करावीत, कागदपत्रे कोणती लागतात, कागदपत्रे अपलोड करण्याची लिंक कोणती आहे याबाबत खाली सविस्तर माहिती दिलेली आहे.
कागदपत्र अपलोड करण्यापुर्वी या बाबी लक्षात घ्याव्यात
1. महत्वाची सूचना – कागदपत्र अपलोड क्षमता १०० के.बी. पर्यंत असावी, “jpg, JPG, jpeg, JPEG, png, PNG” या प्रकाराचे निवडावे या प्रमाणात असावी.
2. अर्जं प्रतीक्षाधीन ठरल्यानंतरच कागदपत्र विहीत वेळेतच कागदपत्रे अपलोड करता येतील
3. अर्जदार नोंदणीच्या वेळेस देण्यात आलेल्या आधारकार्ड नंबर व पासवर्ड भरून लॉगिन करा या बटन वर क्लिक करणे.
4. “निवडा” या बटन वर क्लिक करून कागदपत्र अपलोड करावीत
5. कागदपत्र अपलोड करताना फाइल निवडून घ्यावी व save करण्यापूर्वी शेजारी दिलेल्या विंडो मध्ये अपलोड केलेल्या कागदपत्राची खात्री करून नंतरच save करावी.
6. कागदपत्र जतन करण्यापुर्वी ते योग्य आहेत याची खात्री करून घ्यावी.
7. योजनेच्या लाभार्थी निवडीच्या निकषनुसार, अपलोड केलेल्या कागदपत्रा व्यतिरिक्त अनुषगिक अतिरिक्त कागदपत्राची मागणी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिति / संबधित पशूसवर्धन अधिकारी यांनी केल्यास ती कागदपत्रे उपलब्ध करून देणे लाभार्थ्यास बंधनकारक आहे.
राज्य स्तरीय दुधाळ गाई/म्हशीचे गट वाटप योजना (document upload अपलोड करण्याकरीता कागदपत्रांची यांदी)
टिप : लाल रगात दर्शविलेली कागदपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे, उर्वरीत कागदपत्रापैकी लागू असलेली कागदपत्रे आवश्यकतेनुसार सादर करावी लागतील
1. * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
2. * सातबारा (अनिवार्य)
3. * 8 अ उतारा (अनिवार्य )
4. * अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
5. * आधारकार्ड (अनिवार्य )
6. * 7/12 मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा
7.
*
अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
8. रहिवासी प्रमाणपत्र ( अनिवार्य )
9. दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र ( असल्यास अनिवार्य)
10. बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
11. राशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला ताभ घेता येईल.) (अनिवार्य )
योजनेचे वेळापत्रक
दिनांक
कामाचा तपशील
एकुण दिवस / कालावधी
31 जानेवारी ते
प्रणालीमार्फत लाभार्थ्यांना SMS पाठवणे
फेब्रुवारी 2023
4
4 फेब्रुवारी 2023 ते
मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थीमार्फत कागदपत्रे अपलोड करणे
8
11 फेब्रुवारी 2023
12 फेब्रुवारी 2023
राखीव
1
पशुधन विकास अधिकारी (वि), जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा
13 ते 20 फेब्रुवारी पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे मार्फत कागदपत्रे पडताळणी करुन निवड
2023
8
पूर्ण करणे
21 फेब्रुवारी 2023
राखीव
22-23 फेब्रुवारी
लाभार्थी मार्फत कागदपत्रातील त्रुटी पूर्तता
2023
24 फेब्रुवारी 2023
कागदपत्रे अंतिम पडताळणी
25 फेब्रुवारी 2023
राखीव
26 फेब्रुवारी 2023
अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयार
1
2
1
1
1
कागदपत्र अपलाड करण्यासदभात पशुसवधन विभाग महाराष्ट्र शासनाकडून खालील सूचना देण्यात आलेल्या आहेत
1. सर्व लाभार्थ्यांना कळविण्यात येत आहे की लाभार्थ्यांच्या सुलभतेसाठी पासवर्डचे धोरण बदलण्यात येत आहे. लाभार्थ्यांचा युजरनेम (Username) पूर्वीप्रमाणेच आधारकार्ड क्रमांक राहील. पासवर्ड लाभार्थ्यांनी योजनेसाठी अर्ज भरताना अर्जात उल्लेख केलेल्या बँक खातेक्रमांकाचे शेवटचे 6 आकडे राहील याची कृपया नोंद घ्यावी.
2. कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत दि. 11/02/2023 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. याची कृपया नोंद घ्यावी.
3. प्रणालीमार्फत SMS आलेल्या लाभार्थ्यांनाच फक्त कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
4. दि. 03/02/2023 पर्यंत निवड झालेल्या लाभार्थ्यांना एसएमएस द्वारे सूचित करण्यात येईल व दि. 04/02/2023 पासून कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
5. महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना उपरोक्त योजना लागू नाहीत. केवळ ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवाश्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.