नांदगाव शेतशिवारात वाघाचा मृत्यू! वनविभागात खळबळ
मुल : वनक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व मूल तालुक्यात समाविष्ट असलेल्या नांदगाव येथे वाघाचा मृत्यू झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
सदर घटना आज दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता चे सुमारास उघडकीस आली. पुनाजी नागमकार यांच्या शेतात ही घटना घडली असून. मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप कळले नाही. वनपरिक्षेत्राधिकारी फनींद्र गादेवार हे घटनास्थळावर उपस्थित होणार असून ते आल्यानंतर पंचनामा केल्या जाईल तेव्हाच वाघाचा मृत्यू कशामुळे झाला हे उघडकीस येईल. विजेचा करंट लागुन मरण पावला असल्याची चर्चा असली तरी त्यात सत्यता काय ? आहे हे पुढील कारवाईनंतरच कळणार आहे.
लोकांची वाघ बघण्याकरिता अलोट गर्दी जमली असून वाघाच्या जवळ जाण्यास सर्वांनाच मज्जाव करण्यात आलेला आहे. पत्रकारांना सुद्धा तिथे जाऊ दिल्या जात नसल्यामुळे रोष व्यक्त होत आहे.
Post Views: 755