शिधापत्रिकेसाठी आवश्यक कागदपत्रांची ही आहे यादी? रेशनकार्डमध्ये नव्या सदस्याचे नाव जोडायचयं,नाव कमी करण्यासाठी

273

शिधा पत्रिका योजनेच्या माध्यमातून गरीब व वंचित घटकांना शासनाकडून अत्यल्प दरात तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत धान्य पुरविण्यात येते. समाजातील तळागाळातील घटकांना स्वस्त दरात धान्य मिळावे, त्यांची उपासमार होऊ नये, याच उद्देशाने राज्य सरकारने अन्नपुरवठा योजना सुरू केली आहे. आज समाजात अशी अनेक कुटुंबे आहेत, त्यांना एक वेळचे जेवणही मिळत नाही. अशा घटकांचा विचार करून राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत ही योजना राबविली जाते. त्यासाठी गावोगावी रास्त धान्य दुकाने सुरू करण्यात आली आहेत. या दुकानांद्वारे या घटकांना धान्य देण्यात येते. या योजनेद्वारे शिधापत्रिकाधारकांना अत्यल्प दरात किंवा मोफत गहू, तांदूळ, साखर, तेल, डाळींचा पुरवठा करण्यात येतो. राज्यातील मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर, असंघटीत क्षेत्रातील कामगार, शहरातील फेरीवाले, भाजीपाला विक्रेत्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. त्यामुळे या कुटुंबांना किमान अन्न मिळण्याची हमी शासनाकडून मिळाली आहे. शिधापत्रिका काढण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत, रेशनकार्डसाठी कोण पात्र ठरतो, याची माहिती आजच्या या लेखात आपण घेणार आहोत.

रेशनकार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –

  • ज्या व्यक्तीला रेशन कार्ड काढावयाचे आहे, त्याला खालील कागदपत्रे अर्जासोबत जोडावे लागतात.
  • नवीन शिधापत्रिकेचा अर्ज
  • अर्जदाराचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
  • जुन्या शिधापत्रिकेतील नाव कमी केल्याचा दाखला
  • घरमालकीचा पुरावा
  • वीज बिल
  • बँकेचे पासबुक
  • टेलिफोन, मोबाईल बिल
  • ड्रायव्हिंग लायसेन्स
  • आधार कार्ड
  • घरमालकाचे संमती पत्र किंवा घरमालकाचे वीज बिल
  • घरभाडे करारपत्राची कॉपी
  • नवीन शिधापत्रिकेच्या अर्जाची आपण ऑनलाईन प्रत काढू शकतो. नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग किंवा सेतू केंद्रातही अर्ज मिळू शकतो. अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज व्यवस्थित भरून त्यासोबत यादीत दिलेल्या कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज पुरवठा विभाग  कार्यालयात जमा करावा. त्यासाठी निश्चित केलेले शुल्क भरावे. तसेच शासनाच्या mahafood.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल. त्यामुळे आता रेशनकार्ड काढणे सुलभ झाले आहे. त्यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरे झिजविण्याची गरज उरलेली नाही. ज्यांनी अद्यापपर्यंत शिधापत्रिका काढलेली नाही, त्यांनी वरील माहितीच्या आधारे नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज केल्यास त्यांना त्याचा लाभ मिळेल.

    अशी असते अर्ज दाखल केल्यानंतरची प्रक्रिया –

    शिधापत्रिकेसाठी अर्जदाराने नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज केल्यानंतर हा अर्ज तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडे जातो. तेथे अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची छाननी करण्यात येते. तसेच ती अस्सल आहेत का, याची खातरजमा केली जाते. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पुरवठा विभागातील कर्मचारी अर्जदाराच्या घरी स्थळभेट करतात. यावेळी खरेच अर्जदार अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर राहतो का, त्याच्याकडे किती जमीन आहे, त्याच्या घरात कोणत्या वस्तू आहेत, त्याच्याकडे दुचाकी, चारचाकी वाहन आहे का, त्याच्या घरात काही चैनीच्या वस्तू आहेत का, या सर्व बाबींची पडताळणी करण्यात येते. त्यानंतर तसा अहवाल पुरवठा विभागात दिला जातो. हा अहवाल दिल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत अर्जदारास नवीन शिधापत्रिका मिळू शकते.

  • दूय्यम शिधापत्रिकेसाठी लागणारे कागदपत्रे:-
    1) दुय्यम शिधापत्रिका /गहाळ अर्ज नमूना 15
    2) कूटूंबातील सर्व सदस्याचे आधार कार्डाचे झेराॅक्स प्रत,(झेराॅक्सावर आई व वडीलाचे नाव 3) बॅंक पासबूक 4) गॅसपासबूक/गॅस नसल्याचे एजन्साचे प्रमाणपत्र 5) कुटूंबातील सर्वांचे फोटो 6) मोबाईल क्रमांक 7) जात प्रमाणपत्र/ टि.सी (एकाचे)
    8) गहाळ/हरविले असल्यास स्वस्त धान्य दुकादारचे प्रमाणपत्र
    9) मुलाचे जन्म प्रमाणपत्र 10) उत्पन्न प्रमाणपत्र ( तहसीलदार) 11) दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र 12) रहिवासी प्रमाणपत्र व मनरेगा जाॅंब कार्ड
  • नाव कमी करण्यासाठी शिधापत्रिके लागणारे कागदपत्रे
    1) अर्ज नमुना 2) कुटुंबातील सर्व सदस्याचे आधार कार्डाचे झेराॅक्स प्रत (झेराॅक्सवर आई व वडीलाचे नाव) 3) बॅंक पासबूक 4) गॅस पासबूक/गॅस नसल्यास एजन्सीचे प्रमाणपत्र 5) कुटूंबातील सर्वांचें फोटो 6) मोबाईल क्रमांक 7) जात प्रमाणपत्र /टि.सी (एकाचे)
    8) मूळ शिधापत्रिका
    9) दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
    10) शिधापत्रिकेतील सदस्य मय्यत असल्यास प्रमाणपत्र 11) स्वयंघोशणापत्र
  • नाव वाढ करण्यासाठी लागणारे कागदपत्रे
    1) अर्ज नमूना 8
    2) कूटूंबातील सर्व सदस्याचे आधार कार्डाचे झेराॅक्स प्रत.
    3) शिधापत्रिका मुळ प्रत
    4) बॅंक पासबुक झेराॅक्स
    5) गॅस पासबुक/गॅस नसल्याचे एजन्सीचे प्रमाणपत्र
    6) कुटूंबातील सर्वांचे फोटो
    7) मोबाईल क्रमांक
    8) मतदान ओळखपत्र झेराॅक्स
    9) जात प्रमाणपत्र/टि.सी (एकाचे)
    10) मुलाचे जन्म प्रमाणपत्र
    11) दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
    12) समर्पित प्रमाणपत्र (पूर्वीच्या शिधापत्रिका मधुन नाव कमी झाल्याचे तहसिलदार यांचे प्रमाणपत्र
  • नवीन शिधापत्रिकेसाठी लागणारे कागदपत्रे
    1) नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज नमुना 1
    2) कुटुंबातील सर्व सदस्याचे आधार कार्डाचे झेराॅक्स प्रत (झेराॅक्सवर आई व वडीलांचे नाव)
    3 ) बॅंक पासबूक
    4) गॅस पासबूक/गॅस नसल्याचे एजन्सीचे प्रमाणपत्र
    5) कुटंबातील सर्वांचे फोटो
    6) मोबाईल क्रमांक
    7) जात प्रमाणपत्र /टिसी (एकाचे)
    8) स्वत धान्य दुकानदाराचे प्रमाणपत्र
    9) मूलाचे जन्म प्रमाणपत्र 10) उत्पन्न प्रमाणपत्र ( तहसिलदार)
    11) दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र 12) रहिवासी प्रमाणपत्र व मनरेगा जाॅंब कार्ड
    12) रहिवासी प्रमाणपत्र व मनरेगा जाॅब कार्ड
    13 ) घटटॅक्स/विजबिल/भाडेपत्र
    14) समर्पित प्रमाणपत्र ( पूर्वीच्या शिधापत्रीका मधून नाव कमी झाल्याचे तहसिलदार यांचे प्रमाणपत्र