आजपासून अर्ज भरता येणार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी@MAHA TAIT

133

22 फेब्रुवारीपासून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी; परीक्षा होणार ऑनलाईन, आजपासून अर्ज भरता येणार

वित्र संगणक प्रणालीवरून होणाऱया शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 22 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.

या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया उद्या 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

इच्छुक उमेदवार https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/ या वेबलिंकवरून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. अर्ज करण्यासाठी 8 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर 15 फेब्रुवारीपासून उमेदवारांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे.

परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची पद्धत आणि कालावधी याबाबतची माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांना कोणत्याही प्रमाणपत्राच्या मूळ प्रती जोडण्याची आवश्यकता नसून मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी दिली.