राज्य उत्पादन शुल्क पोलीस अधीक्षक यांच्या धाडीत चीतेगाव येथे अवैध बनावट दारूचा सापडला कारखाना ,. (१६ लाख ५० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त)

125

 मुल – मुल पासून पाच किलोमिटर अंतरावर मुख्य नागपूर हायवेला लागून चीतेगावं रस्त्यालगत अवैध्य बनावट नकली देशी दारूचा मिनी कारखाना असल्याची गोपनीय माहिती चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क पोलिस अधीक्षक श्री.संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली अन्य दहा अधिकारी व कर्मचाऱ्यांसह धाड टाकली. धाडीत हजार लिटरच्या नकली दारू तयार केलेल्या दोन पांढरा रंगाच्या सिंटेक्स टाक्या, १४ मोठे निळे ड्रम, तीन खाली ड्रम,एक एच.पी. मोटार पंप, दारु तयार करण्याची मशीन, आरेंज इसेन्स फ्लेवर भरलेली बाटल , नाइंटी बाटलचे खोके, प्लास्टिक बालटी, रॅकेट देशी दारु,प्रवरा लिहिलेले बाटल वर चीपकवले जाणारे पॅकिंग सिम्बॉल ज्यावर प्रवरा दिस्टीलरी प्रवरानगर, प. डॉ.वी.वी.पा.स.सा.का. लि.राहता जी.अहमदनगर,महाराष्ट्र.०१२. असा प्रिंट लेबल असलेले अनेक बाक्स सापडले. तिथेच राणी हिराई ग्राम विकास बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर र. न.एफ.१३४६० ए.व्ही.जी. गोट फार्म शेळी पालन केंद्र चीतेगाव अध्यक्ष कू. अरुणा ही. मरस्कोल्हे या नावाचे व्हिजिटीग कार्ड ,पाईप, श्री.पवन वर्मा, शाम मडावी या नावाने आलेले पार्सल खोके, आणि बनावट दारु तयार करण्यासाठी लागणारे अत्यावश्यक साहित्य जप्त करुन सिल करण्यात आले. ज्याची किंमत अंदाजे १६ लाख ५० हजार रुपये असल्याचे चौकशी अधिकारी संजय पाटील यांनी सांगितले. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना इथे दारु तयार केली जाते हे लक्षात येऊ नये म्हणून बाहेरून असा देखावा तयार करून आत अवैध्य नकली बनावट दारु तयार करण्याचे ठिकाणी बाहेरून समोर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चितेगाव असे लावलेले बोर्ड, आणि दारु तयार करण्याच्या सेडच्या बाहेर धानाचा कोंडा भरलेले चारशे पोते, अशा बनावट ठिकाणी केला जात होता दारूचा मिनी कारखाना तयार करण्यात आला होता. एवढेच नव्हेतर बाजूच्या शेडमध्ये कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय भरविल्या जात असल्याचे लावलेल्या बोर्ड वरुन दिसून आले. एवढी मोठी धाड चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच पडली असल्याचे धाड टाकणाऱ्या अधिकाऱ्यांनी बोलून दाखविले आहे. एकंदरीत महाराष्ट्र राज्याच्या मुख्य पदावर असलेल्या नेत्याच्या मुळ गावापासून केवळ पाच कीलो. मी.अंतरावर मुख्य हायवे रहदारीच्या मार्गावर किती दिवसापासून हा अवैध्य बनावट दारूचा कारखाना सुरु असून मुल पोलिसांच्या नजरेतून सुटावे हे सुद्धा न उलगडणारे कोडेच म्हणावे लागेल. धाडीची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली भरारी पथकांतील श्री वाघ, संदीप राऊत,विकास थोरात,जगदीश पवार,अमित क्षीरसागर,अभिजित लीचडे,मोनाली कुरुडकर यांनी केली.