फिमेल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपुर येथील रासेयो विभाग द्वारा कढोली बु येथे स्वच्छ गाव व्यसनमुक्त गांव या विषयावर आधारित युवतीचे निवासी शिबीर दिनांक १७ जानेवारी ते २३जानेवारी२०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आले
शिबाराचे उदघाटन कार्यक्रम १८जानेवारी ला करण्यात आले
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा फिमेल एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष अॅड विजय मोगरे अॅड विजय मोगरे, उद्घाटक सुदर्शन निमकर माजी आमदार तथा उपाध्यक्ष सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपुर, प्रमुख अतिथि संस्थेचे सचिव अॅड पुरुषोत्तम सातपुते सरपंच राकेश हिंगाने उपसरपंच मीना पडवेकर शाळेचे मुख्याध्यापक श्री नगराळे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ मिनाक्षी ठोंबरे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राजेंद्र बारसागडे प्रा डॉ कल्पना कावऴे,प्रा डॉ मेघमाला मेश्राम, रासेयो प्रतिनिधी कु.तन्वी भगत यांची प्रामुख्याने विचारमंचावर उपस्थिती होती
कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड विजय मोगरे शिबीरात संबोधन करता ना म्हटले की आमच्या विद्यार्थिनी या सात दिवसात गावचे परिवर्तन करणार नाही परंतु शिबाराच्या माध्यमातुन दिलेल्या संदेशातुन गावक-यानी एकजुट होऊन प्रयत्न केल्यास नक्कीच बदल होणार अशाप्रकारे विचार व्यक्त केले व शिबीर यशस्वी करण्यास शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमाचे उदघाटक सुदर्शन निमकर यानी सरपंच ते आमदार या आपल्या राजकीय प्रवाहासात रासेयोची भुमिका महत्वाची आहे असे विचार व्यक्त केले व शिबीर यशस्वी करण्यास शुभेच्छा दिल्या,
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संस्थेचे सचिव अॅड पुरुषोत्तम सातपुते यानी शिबीयाथी मुलीना मार्गदर्शन करताना म्हटले की रासेयो शिबीरातून नेतृत्व करण्याची संधी मिळते व विद्यार्थिनी च्या सुप्त कला गुणाना संधी मिळण्याचे रासेयो विभाग एक केन्द्र आहे असे विचार व्यक्त केले, राकेश हिंगाने यानी शिबीराथी मुलीना कोणतीही अडचन होणार नाही याची हमी दिली नगराळे यानी शिबीराथी॔ विद्यार्थिनी ना शुभेच्छा दिल्या महाविद्यालयाच़्या प्राचार्य डॉ मिनाक्षी ठोंबरे यानी विद्यार्थिनीना शिबीर यशस्वी करण्यास शुभेच्छा दिल्या
संस्थेचे अध्यक्ष अॅड विजय मोगरे, सचिव अॅड पुरुषोत्तम सातपुते यानी कार्यक्रमाचे उदघाटक सुदर्शन निमकर माजी आमदार तथा उपाध्यक्ष सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपुर यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली
कार्यक्रमाची प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राजेंद्र बारसागडे सुत्र संचालन प्रा डॉ कल्पना कावऴे, आभार रासेयो प्रतिनिधी तन्वी भगत यानी मानले
महाविद्यालयातील संगिंत
विभागाचे प्रा अशोक बनसोड व त्याच्या चमुने विद्यापीठ गित व स्वागत गायले
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शिबीराथी॔ व कढोली ग्रामस्त मोठ्या संख्येनी उपस्थिती होती.