अनुदान रखडल्याने मुल शहरातील घरकुल लाभार्थी चिंतेत प्रधानमंत्री आवास योजना: उर्वरीत अनुदान मिळण्यााबत

83

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गरीब,गरजू नागरीकांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेची अंमलबजावणीही करण्यात आली. परंतु केंन्द्राचे अनुदान अडकल्याने मुल शहरातील लाभार्थी त्रस्त झाले आहे. गत 3 वर्षापासून मुल नगरपरीषद अंतर्गत येत असलेल्या लाभाथ्र्यांना केंद्र सरकार कडून घरकुल योजनेचे अनुदान देण्यात आले नाही. त्यामुळे अनेक लाभाथ्र्यांच्या घराचे काम अर्धवट आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 2020 मध्ये 3 वर्षापूर्वी मुल नगरपरीषद अंतर्गत लाभाथ्र्याची निवड करून लाभ देण्यात आला. योजनेतर्गंत दोन लाख 50 हजार रूपये मंजूर करण्यात आले हेाते. यात केंन्द्र व राज्य सरकारचा वाटा असतो. मुल नगरपरीषदेने आतापर्यंत राज्यरकारच्या अनुदानांतर्गत प्रत्येक एक लाख 60 हजार रूपये लाभाथ्र्यांच्या बॅक खात्यात जमा केले परंतू केंन्द्राच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत घराचे काम अर्धवट राहिले आहे. या प्रकरणी अनिल वसंत गुरूनुले यांनी नगरपरीषदेला अर्ज दिलेले आहे. अद्यापही घरकुल अनुदान न दिल्याने लाभाथ्र्यांमघ्ये तीव्र नाराजी आहे.मुल शहरातील 88 लााभाथ्र्यांनी घरकुल मंजूर करण्यात आले. त्यापैकी 35 लाभ्र्याांनी योजनेचा लाभ घेतला. 35 लोकांचे बांधकाम पुर्णत्वास आले पंरतू अजून पर्यंत 90हजार बाकी आहे तरी घरकुल लाभ्र्याांची मागणी आहे कि उर्वरीत निधी देण्यात यावा .
त्यामुळे योजनेच्या अंमलबंजावणीवरच प्रश्नचिंन्ह निर्माण होत आहे. या संदर्भात अधिका-यांनी लक्ष देवून रखडलेले अनुदान तातडीने देण्यासाठी पाठपूरावा करावा याबाबत मुल नगरपरीषदेचे मुख्याधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले. यावे ळी अनिल गुरूनुले ,माजी नगरसेवक मिलींद खोब्रागडे सह घरकुल लाभार्थी उपस्थीत होते.