प्रथम क्रमांक पटकाविणारा ओंकार नागोशे ठरला कला निकेतनचा हिरा
मूल – स्थानिक सेंट अॅन्स हायस्कूल येथे इयत्ता 7 वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी ओंकार आझादब्रम्हा नागोशे याने वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी तबला वादनाच्या प्रारंभीक, प्रवेशिका (पूर्व) आणि प्रवेशिका (पूर्ण) अशा तिन्ही परीक्षा सलग प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्या आहेत. ओंकार याने मिळविलेले यश स्थानिक कला निकेतन संगीत संस्थेत तबला वादनाचा सराव करुन मिळविले आहे. त्याला कला निकेतनचे संचालक तथा कला शिक्षक अशोक येरमे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. इयत्ता चवथी पासुन तबल्याचे शिक्षण घेत असलेला ओंकार येथील अधिवक्ता आझादब्रम्हा नागोशे यांचा चिरंजीव आहे. पुढील काळात ओंकारला तबला वादना सोबतच हार्मोनियम वादनात यश संपादन करायचे आहे. एकाच वर्षात तबला वादनाच्या सलग तीन परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.