आधार कार्ड प्रत्येकासाठी आवश्यक झाले आहे. आता शासनाच्या फतव्याने ज्या बालकांकडे आधार कार्ड नसेल त्याला पोषण आहार मिळणार नाही, शिवाय आधार कार्ड अपडेट केल्यानंतरच बालकांना पोषण आहार मिळणार आहे. त्यामुळे हजारो बालक पोषण आहारापासून वंचित राहणार असल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
देशातील प्रत्येक बालक सुदृढ व्हावा या हेतूने केंद्र शासनाने बालकांसाठी अंगणवाडीत पोषण आहार योजना सुरू केली; परंतु ज्या बालकांचे आधार कार्ड नसेल तर त्या बालकांना पोषण आहार मिळणार
नाही.
शिवाय आधार कार्ड अपडेट केल्यानंतरच पोषण आहार मिळणार असा फतवा काढलेला आहे. शासनाच्या या घोषणेनंतर आधार कार्ड नसलेल्या व आधार कार्ड अपडेट केले नसलेल्या बालकांना पोषण आहार न मिळाल्यामुळे बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढणार आहे.
याला जबाबदार कोण राहणार, प्रत्येक बालकाला पोषण आहार देणे गरजेचे आहे; परंतु याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. बालक सुदृढ होण्यासाठी पोषण आहाराची गरज आहे. बालकाचे आधार कार्डच नसेल शासनाच्या या फतव्यामुळे तो शिल्लक राहिलेला पोषण आहार मग कोण गडप करणार, असा प्रश्न पडला आहे.