मूल येथे दुचाकी चोरास अटक

80

मुल : : दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला मूल पोलीसांनी अटक केली आहे. दि. १२ जानेवारी रोजी फिर्यादी रा मुल यांनी पोस्टे मुल येथे येवून तक्रार दिली की त्यांच्या मालकीची बजाज पल्सर किंमत ४० हजार रू. ही त्याचे घरासमोर उभी करून ठेवली असता सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान त्याचा ट्रक चालक सचिन तिवाडे रा. उश्राळा ता.मुल याने चोरून नेल्याचा संशय आहे अशी तोंडी तक्रार दिल्याने पो.स्टे. मुल येथे रोजी नोंद आहे. पो.स्टे. मुलचे पोउपनि राठोड हे सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना गुप्त बातमीदाराकडून माहीती मिळाली की, सदर संशयीत सचिन तिवाडे हा गोंडपिपरीकडे जात आहे. अशा माहीतीवरून तपास पथकातील अधिकारी कर्मचारी हे पो.स्टे. गोंडपिपरी परीसरात गेले असता मौजा आक्सापूर येथे सचिन प्रभाकर तिवाडे (३१) रा. उश्राळा हा गुन्हयातील चोरीची मोसा बजाज पल्सर किंमत ४० हजार रू. सह मिळून आल्याने मौजा आक्सापूर पो.स्टे. गोंडपिपरी येथे जप्ती पंचनामा कारवाई करून आरोपी व जप्त मोटर सायकल ताब्यात घेवून पो.स्टे. येथे आले व सदर आरोपीस अटक केली.