जी.डी.सी.अॅण्ड ए. व सी.एच.एम. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने अर्ज आमंत्रित-जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे

56

चंद्रपूर, दि. 09 : शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी.डी.सी.ॲण्ड ए. बोर्ड) कडून घेण्यात येणारी शासकिय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.अॅण्ड ए.) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा दि. 26, 27, व 28 मे, 2023 रोजी घेण्यात येणार असुन अर्ज भरण्याची मुदत 5 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2023 पर्यंत आहे. चालानद्वारे बँकेमध्ये शुल्क भरावयाची मुदत 8 फेब्रुवारी 2023 पर्यंत आहे.

सदर परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच स्वीकारण्यात येणार असून ऑनलाईन अर्जाव्यतीरिक्त अन्य कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. ऑनलाईन अर्ज https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर स्वतःचा युजर आयडी व पासवर्ड तयार करुन करता येईल. परीक्षेकरीता लागणारी आवश्यक अर्हता, अनुभव, आवश्यक कागदपत्रे अर्जासाठी तपशील, परीक्षा शुल्क, परीक्षेच्या अटी व नियम, सुट, अभ्यासक्रम व इतर तपशिलासाठी सविस्तर अधिसुचना https:sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर महत्वाचे दुवे मधील जी.डी.सी.ॲन्ड ए.मंडळ येथे उपलब्ध आहे. यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांनी कळविले आहे.