अवैध कोंबड बाजारावर पोलिसांची कारवाई

93

प्रतिनिधी / मुल : चंद्रपूर जिल्ह्यात छुप्या पद्धतीने अवैध धंद्याच बाजार सुरू आहे मात्र पोलिसांची सतर्कता सदर गुन्हेगारी उधळून लावत आहे. जिल्ह्यातील मूल तालुक्यात मौजा मंदा तुकुम गावाशेजारी तलावाजवळील जंगलात काही जण अवैध रित्या कोंबड्यांची झुंज लढवून पैश्याची बाजी लावत असल्याची गोपनीय माहिती मुल पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याठिकाणी धाड मारली असता त्याठिकाणी राहुल गजानन धोंगडे (४७) रा. पळसगांव ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर, सचिन सुधाकर वासाडे (३५) रा. आमडी ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर, अरविंद सुंदरशाहा सिडाम (३७) रा. कवडजई ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर, चैतन्य विलास डाहूले, (२२) रा. इंदीरानगर चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, रमेश साधुजी बलकी (३३) रा. इंदीरानगर, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, मनोज बंडु महाकुलकर, (३२) रा. इंदीरानगर, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, बिंदुशिल वनवास राऊत, (३२) रा. इंदीरानगर, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, घनशाम गोपाळराव मोरे, (३९) रा. इंदीरानगर, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, विलास भगवान शेडमाके, (४०) रा. वार्ड क्र १३, सावली, ता सावली जि. चंद्रपूर, ओमप्रकाश मधुकर मोहूर्ले, (४०) रा. वार्ड क्र १३, सावली, ता सावली जि. चंद्रपूर, नागेश गोविंदा मांदाळे, (४०) रा. वार्ड क्र १२, सावली, ता सावली जि. चंद्रपूर, आनंद लक्ष्मण चलकलवार, (६५) रा. वार्ड क्र १४, सावली, ता सावली जि. चंद्रपूर, उत्तम पुरुषोत्तम मोहूर्ले, (४०) रा. वार्ड क्र १२, सावली, ता सावली जि. चंद्रपूर असे कोंबडा जुगार खेळताना मिळून आले असून त्यांच्या ताब्यातून ४ जखमी कोंबडे, नगदी २ हजार ४३० रू ७ अॅन्ड्रॉईड मोबाईल व ६ मोटार सायकल असा एकूण ३ लाख ३८ हजार ४३० रू चा माल जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची यशस्वी कारवाई पो स्टे मुल येथे पोउपनि पुरुषोत्तम राठोड, नापोअं चिमाजी देवकत्ते, गजानन, पोअं संजय, पोअं अंकुश, चालक पोअं स्वप्नील यांनी उपविपोअ मल्लीकार्जुन इंगळे सा. व पो नि सतीशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात केली आहे.