नवभारत विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय राजोली येथे वार्षिक स्नेहसंमेलन

73

नवभारत विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन शिक्षण प्रसारक मंडळ मूलद्वारा संचालित नवभारत विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय राजोली येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहशालेय उपक्रमांतर्गत वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. १०० मीटर दौड, गोळा फेक, उंच उडी, लांब उडी, कबड्डी, क्रिकेट व लंगडी विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

यासोबतच प्रश्न मंजुषा, वकृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, नक्कल, नाटिका, नृत्य आयोजित केले होते. उद्घाटन व समारोपीय कार्यक्रमाला मंडळाचे सचिव अॅड. अनिल वैरागडे, डॉ. बोरकर, राजोलीचे सरपंच जितेंद्र लोणारे, प्राचार्य राजीव येनुगवार, सुधारक लाकडे, शरीफभाई, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. धर्माधिकारी, पेरसिंगवार, श्री. सोनवाणे, श्री. हरणे, शालेय मंत्रिमंडळातील राकेश गेडाम, सुविधा चौधरी, हर्षा मेंढुळकर, मृणाली देवगीरकर, सौरभ बोरकर, तुषार लेनगुरे, नम्रता लाकडे उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. प्रास्ताविक श्री. टांगले यांनी केले. संचलन श्री. खडसे यांनी, तर आभार दरेकर यांनी मानले.

आयोजनासाठी श्री. मांडवकर, धनोरे, बोबडे, उमरे, टिकले, ठिकरे, भानारकर, वरगंटीवार, वनकर, पोडे, बोरकर, आर. आर. उईके, एच. के. उईके, आलाम, बगडे, कुरसंगे, मेडपल्लीवार, सहारे, झाडे यांनी सहकार्य केले.