शेतकऱ्यानी घेतली नामदार मुनगंटीवार यांची भेट

47

शेतकऱ्यानी घेतली नामदार मुनगंटीवार यांची भेट,शेतकऱ्याच्या समस्या सोडविण्याबाबत
मूल तालुक्यातील शेतकऱ्यानी क्षेत्राचे आमदार व राज्याचे वनमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट देवुन विविध समस्यांचे निवेदन सुपुर्द केले, यावेळी नामदार मुनगंटीवार आणि शेतकऱ्यामध्ये सकारातमक चर्चा झाली.
मागील अनेक महिण्यांपासुन वन्यप्राणी आणि मानवांमध्ये संघर्ष सुरू असुन अनेक शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यामुळे नाहक बळी जात आहे, शेतात पिक घेतल्याशिवाय शेतकरी आपल्या कुटुंबाची उपजिवीका करू शकत नाही मात्र नेहमी होणाऱ्या वन्यप्राण्याच्या हल्लामुळे शेती करायची कशी असा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे पडला आहे, तालुक्यात मोठया प्रमाणावर वाघ, बिबट आणि अस्वलांचे वारंवार होणारे हल्ले शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे. यामुळे शेतकऱ्यांना खालील योजनेचा लाभ मिळवुन दयावे .
मागेल त्या शेतकऱ्याला शासनामार्फत १०० टक्के अनुदानावर सौर कुंपन देण्यात यावे. (झटका मशीन) आणि तालुका स्तरावर सौर कुंपन मशीनचे दुरूस्ती केंद्र उभारण्यात यावे
वन्यप्राण्याच्या हल्लातील बाधीत गावाना प्राधान्य देवुन जंगलासभोवताल सौर कुंपन उभारण्यात यावे. जंगलाजवळील शेतशिवार असलेल्या शेतकऱ्यांना उच्च प्रतिच्या चार्जिंग बॅटरी उपलब्ध करून देण्यात यावे. सेंद्रीय शेतीला चालणा देण्यासाठी तालुका स्तरावर सेंद्रीय खत प्रकल्प उभारण्यात यावे.टाटा ट्रस्ट प्रकल्पातुन वगळयात आलेल्या गावांचाही समावेश करण्यात यावे.भाजीपाला उत्पादकांसाठी मूल शहरात भाजीपाला मार्केटची निर्मीती करण्यात यावेराज्यपुरस्कृत कृषी विज्ञान केंद्राची निर्मीती करून तज्ञ शास्त्रज्ञांची नियुक्ती करावी व आधुनिक शेतीला चालणा देण्यात यावे
शेतकऱ्याच्या शिष्टमंडळात भाजपाचे शहर सरचिटणीस चंद्रकांत आष्टणकर, शेतकरी नेते तथा भाजीपाला उत्पादक मंगेश पोटवार, प्रशांत मेश्राम, प्रभाकर सोनुले, गिरीधर वाघाडे, मनोज चावर े उमाजी पाटील चुधरी, दामोधर सोनुले, विजय कन्नाके उपस्थित होते.