CRPF मध्ये बंपर भरती; झटपट अर्ज करा !केंद्रीय राखीव पोलीस दलात 1458 जागांसाठी भरती

73

केंद्रीय राखीव पोलीस दलानं भरती (Recruitment by Central Reserve Police Force) अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार CRPF मध्ये ASI, हेड कॉन्स्टेबल या पदांसाठी भरती केली जाणार आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार अधिकृत वेबसाईट crpf.gov.in द्वारे अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची नोंदणी प्रक्रिया कालपासून (4 जानेवारी 2023) सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी 2023 निश्चित करण्यात आली आहे. उमेदवार येथे दिलेल्या माहितीच्या आधीरे या भरतीसाठी अर्ज करू शकतात

या भरती प्रक्रियेद्वारे केंद्रीय राखीव पोलीस दलात 1458 पदांची भरती केली जाणार आहे. ज्यासाठी 15 फेब्रुवारी 2023 रोजी प्रवेशपत्र जारी केलं जाईल. उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी, स्किल टेस्ट, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्टच्या आधारे केली जाईल.

भरतीसाठी अर्ज करणार्या सर्वसाधारण, EWS आणि OBC प्रवर्गातील पुरुष उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावं लागेल. SC/ST अर्ज करताना, सर्व श्रेणीतील माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

असा करा अर्ज

  • सर्व उमेदवारांनी सर्वात आधी CRPF च्या crpf.gov.in च्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी.
  • त्यानंतर भरती लिंकवर क्लिक करा, त्यानंतर तुमच्यासमोर नवं पेज ओपन होईल.
  • आता मेन पेजवर उपलब्ध CRPF भर्ती ASI, हेड कॉन्स्टेबल या लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर उमेदवारांनी विचारलेले सर्व तपशील भरावे आणि सबमिटवर क्लिक करा.
  • आता उमेदवार अर्ज भरा आणि अर्ज शुल्क तिथे दिलेल्या माहितीनुसार भरा.
  • यानंतर भरतीचा फॉर्म सबमिट करतात.
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर तो फॉर्म डाऊनलोड करुन प्रिंट काढा.
  • प्रिंट काढलेली प्रत तुमच्याकडे जपून ठेवा.

अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी

जाहिरात क्र.: A.VI.19/2022-Rectt-DA-3

Total: 1458 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) 143
2 हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) 1315
Total 1458

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण     (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण     (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.

शारीरिक पात्रता: 

प्रवर्ग उंची 
छाती
पुरुष  महिला पुरुष
General, SC & OBC 165 सें.मी. 155 सें.मी. 77 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
ST 162.5 सें.मी. 150 सें.मी. 76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

वयाची अट: 25 जानेवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹100/-  [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2023 

परीक्षा (CBT): 22-28 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा